"मे आय कम इन सर? " किलकिल्या दरवाजातून बघणारा चेहरा मला विचारतो...
"यस प्लीज" खोटं हसू चेहऱ्यावर आणून मी म्हणतो. जरा स्थिरस्थावर झाल्यावर
"सो कॅन यु प्लीज टेल मी अबौट योर्सेल्फ?" ने प्रश्नोत्तरांचा ओघ सुरु होतो… एका पाठोपाठ एक कॅन्डीडेट्स येणार असतात. नॉलेज , कॉन्फीडन्स, बॉडी लँग्वेज वगैरे नाही नाही त्या गोष्टी वापरून मला१५ पैकी ३ लोक निवडायचे असतात… आधीच aptitude, ग्रुप डिस्कशन यामध्ये अर्धा दिवस संपलेला असतो. त्यामुळे साधारण दहा मिनिटं ते अर्ध्या तासात एक या हिशेबाने मी मुलाखती घेत असतो. feedback फॉर्म्स भरून द्यायला थोडा वेळ मिळतो तेव्हा मी (बहुधा डीन च्या) केबीन च्या खिडकीतून बाहेर पाहत उगीचच सिनेमात दाखवतात तसं थंडावलेल्या कॉफीचे घुटके घेत उभा राहतो…
"फोर्ब्ज मार्शल आलीये, तू बसणार नाहीयेस का?" पुरुषोत्तम ची practice चालू असताना कोणीतरी येउन म्हणाल्यावर मी पळतच तिकडे गेलो. पहिल्यांदा aptitude टेस्ट होती. मी ती दिली. त्यात shortlist होणाऱ्या लोकांची टेक्निकल टेस्ट झाली . त्यामधून काही मुलं सिलेक्ट झाली…aptitude नंतर रिझल्ट लागणार असल्यामुळे तिथंच थांबावं लागलं-- तीच परिस्थिती टेक्निकल नंतर. मुलाखतीसाठी निवड झालेल्या मोजक्या मुलांमध्ये माझं नाव आलं आणि अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार पहिलंच! जेव्हा माझ्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर ने माझ्याकडे पाहिलं तेव्हाच मला पहिल्यांदा माझा अजागळ "पुरुषोत्तमी" अवतार जाणवला!
"असा जाणारेस इंटरव्यूला ?" त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचा मराठी अनुवाद. (एकांकिकेत मी मरतो आणि त्याक्षणी जमिनीवर लोळण घेतो असा सीन असल्यामुळे ) मळकं गोल गळ्याचं टी शर्ट आणि जमिनीच्या बाजूला घासून फाटलेली मळकी जीन्स, त्याखाली फ्लोटर्स असा माझा अवतार मला जाणवला. समोर सुटाबुटात वावरणारे कंपनीतले लोक होते. "मी पटकन कपडे बदलून येतो"
"अरे मुर्खा, तुला आत बोलवताहेत ते" (पुन्हा सोयीस्कर मराठी अनुवाद!)
"सर प्लीज त्यांना सांगा ना, मी चटकन तयार होऊन येतो"
यापुढे आमच्यात जो संवाद झाला त्यानंतर "टीपीओ या व्यक्तीचा उगम हा मुळात भाव खाण्यासाठी आणि असहकार्य करण्यासाठी झाला आहे" असे माझे मत तयार झाले!
धावत पळत जाऊन मी विनोदी वेशभूषा करून आलो. कसेतरी विंचरलेले केस, घाई गडबडीने टक-इन केलेलं शर्ट, कोणाचेतरी मागून घेतलेले थोड्या मापाचे पायातून बाहेर निघणारे शूज अशा अवतारात बदकचालीने मी पुन्हा तिथे पोहोचलो. टीपीओ तिथे नव्हता,
"माझा इंटरव्यू होता" हातात फाईल्स घेऊन लगबगीने ये जा करणाऱ्या एका बाईला मी म्हटलं.
"सो?" तिने माझ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं…
"अं,,, मी,,,"
"तुझं नाव ?" --अनुवाद! हातातल्या फाईल्समधले कागद चाळत तिने विचारलं.
मी नाव सांगितलं. ती एच आर होती. त्यामुळे आमच्यात पुढे जो सुखसंवाद झाला तो पुढील प्रमाणे अनुवादित….
"तुझं नाव सगळ्यात पहिल्यांदा कॉल औट केलं होतं "
मी- "खरंतर माझे कपडे… "
"वेळेची काही किंमत आहे कि नाही तुला? हे कॉलेज नाही कॉर्पोरेट कंपनी आहे" तिचं कॉलेज बहुधा वेळा पाळत नसावं !
मी - "आएम सॉरी "
"सॉरी ? तू इंटरव्यू साठी आलाहेस आणि तुला वेळेत येता येत नाही?" वगैरे वगैरे….
मी तिला उलट उत्तर देत निर्लज्जासारखा तिथेच उभा राहिलो. ती तिथून तावातावाने निघून गेली. आणि आमचा टीपीओ लांबून मजा बघत होता!! सुदैवाने सगळ्यात शेवटी मला मुलाखतीकरता आत बोलवण्यात आलं. मी आतापर्यंत दिलेली ती सर्वोत्कृष्ट मुलाखत असावी. इंटरव्यूअर ने मला चहा ऑफर केला आम्ही इतरही गप्पा मारल्या आणि मी बाहेर पडलो.
थोड्याच वेळात निकाल जाहीर होणार होता आणि आमच्या टीपीओनं सांगितलं कि 'फायनली कोणाकोणाला घ्यायचं ते त्या अमुक अमुक madam आणि इंटरव्यू पँनल ठरवणार आहेत,' बोलता बोलता त्याने जो दिशानिर्देश केला तो त्या सुखसंवाद करणाऱ्या madam कडेच! म्हणजे माझं भविष्य मी मघाशीच ठरवलं होतं!!
इंटरव्यू हा फक्त फार्स होता!! मी चमत्काराची अपेक्षा करत होतो परंतु केबिन मध्ये madam च्या विरुद्ध बाजूला बसलेले panel मेम्बर्स बघून निकाल काही फारसा सुखावह नसणार हे कळतच होतं! फायनल सहापैकी चार लोक निवडले गेले होते. मी त्यात नव्हतो! बदकासारखा चालत मी घरी पोचलो आणि पहिल्यांदा कपड्यांचा एक सेट तयार करून ठेवला आणि माझ्या मापाचे बूट कोणाकडे आहेत ते ताबडतोब बघायचंही ठरवून टाकलं!
नंतर कधीतरी इमर्सन आली. यावेळी मात्र मी ठरवलेले कपडे घालून कॅम्पस साठी पोचलो. तयारीने! एप्टीट्यूड मधून शॉर्ट लिस्ट झालो मग टेक्नीकल क्लिअर केली..सगळे निकाल पूर्वीसारखेच येत गेले.. अगदी इंटरव्यूचा सुद्धा! :) पण ड्रामेटिकली.. दहा जण इंटरव्यू साठी सिलेक्ट झाले होते त्यापैकी 4 जणांची नाव पुकारण्यात आली. त्यात माझं नाव होतं.एक गोड शिरशिरी अंगभर सळसळत गेली. त्यापाठोपाठ "except these names rest all are selected" असे शब्द कानात जाळ ओतत गेले. क्षणापूर्वी असणारं "झालं बुवा सिलेक्शन" हे क्षणभराचं फिलिंग त्या वाक्यात मातीमोल झालं!

--X-O-X--
" दिज आर रेस्ट ऑफ़ द फॉर्म्स.. या एका कैंडीडेटला एच आर राउंड साठी घ्या. या एकाला त्या पॅनेलकड़े पाठवा. आएम इन डायलेमा." मी सूचना देत एच आर ने दिलेले बाकीचे सी व्ही नजरेखालुन घालतो. "Objective : to pursue challenging career in an organization that would enable blah blah blah.." जर हिला विचारलं की तुझं करिअर ऑब्जेक्टीव् एका दमात..एवढं कशाला? नुसतं पाठ म्हणून दाखवता येईल का? तर सांगता येणार नाही.. तीस चाळीस टक्के माहिती म्हणजे निव्वळ निरुपयोगी! ऑनलाइन जगात घरचा पत्ता पासपोर्ट नंबर आईवडीलांचे पूर्ण नाव कॉलेजातल्या कुठल्यातरी इव्हेंट चं नुसतं पार्टीसिपेशन हे रेझुमी वर कशाला हवं? पण असो!
मी किलकिल्या दरवाजात उभ्या एच आर rep ला हातातल्या सी व्ही वरचं नाव वाचून दाखवतो.... दरवाजा बंद होतो आणि थोड्याच वेळात पुढच्या उमेदवाराच्या चेहऱ्यासकट पुन्हा किलकिला होतो...
--X-O-X--
"इंटरव्यूला बाहेर पडतोस म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव करायला पाहिजे तुला.. मैं इंटरव्यूतक पहुँचता तो कभी बाहर नहीं निकलता" छुपा अर्थ स्पोकन इंग्लिश मधे वीक आहेस तू..पासून "काही नाही रे होशील सिलेक्ट.. आमची तर एप्टीट्यूडच crack करायचे वांधे आहेत" पर्यन्त सगळ्या पद्धतीचे सल्ले मिळत होते. तीन कॉलेजचे उमेदवार एकत्र असल्याने फिल्टर लावायला सोपं पड़ावं म्हणून किर्लोस्कर ब्रदर्स ने टेक्निकल मधून शॉर्ट लिस्टेड लोकांना ग्रुप डिस्कशनला बोलावलं होतं. आमच्या ग्रुप ला ब्रेन ड्रेन हा विषय होता.. स्वदेस च्या शाहरुख चं उदाहरण देऊन मी बऱ्यापैकी बोलबच्चन दिले.. 12 जणांच्या आमच्या ग्रुप मधून 3 जण पी आय साठी निवडले गेले.. मी त्यात होतो. कमाल म्हणजे ग्रुप डिस्कशन मधून पुढे न गेलेल्या लोकांमधे "माझं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव व्हायला पाहिजे" म्हणणाऱ्या व्यक्ती होत्या.. पर्सनल इंटरव्यू छान झाला.. आमच्या स्ट्रीमचे आम्ही दोघेजण होतो पण त्यांना एकच रिक्वायरमेंट होती. सिलेक्ट झालेल्या लोकांना ऑफर लेटर्स लगेच मिळणार अशी वदंता होती. ती खरी ठरली.. काही लोक खाकी लिफाफे घेऊन आले आणि आमच्यापैकी देशपांडे नावाच्या मुलीच्या हातात तो लिफाफा पडला. नशीबाने (किंवा इतर जे काही फॅक्टर्स असतात त्या सगळ्यांनी) पुन्हा एकदा टांग दिली होती! संधी सारखी सारखी दरवाजा ठोठावत होती पण कॅम्पस सिलेक्शनचं गणित काही सुटता सुटत नव्हतं..
बॅक्सटर फार्माच्या प्रिलिमनरी राउंड मधून पुढे गेलेल्या लोकांचा जीडीपीआय चा एकच राउंड होता.. तिथंही इंटरव्यूतुन बाहेर पडलो. मँकलुईड फार्मा ला पण तेच. त्यांनी तर मी आणि अजून एकजण सोडून सगळ्यांना घेतलं! :) माझ्यासाठी तर ही हाईट होती!! काहीतरी चुकत होतं खास पण काय तेच कळत नव्हतं आणि कुणी सांगणारंही नव्हतं..
वर्ष संपत होतं तसं कंपन्यांच्या ओघ आटला होता. आता चुकून माकुन एखादी कंपनी येत होती परंतु माझ्या स्ट्रीम साठी नव्हती किंवा माझे एवरेज मार्क्स पुरेसे नव्हते किंवा टी पी ओ शी निर्माण झालेली कटुता यापैकी किंवा अशा अनेक तत्कालीन कारणांमुळे मला अपियर होता येत नव्हतं.. बरोबरीचे बरेच लोक प्लेस झाले होते त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंट हा विनाकारण प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. आतापर्यंत मी इंटरव्यू मधून कसा बाहेर पडलो हे ऐकण्यात कोणाला काही स्वारस्य असेल असं वाटत नव्हतं!
--X-O-X--
..ही आतापर्यंतची तिसरी कॉफी होती. "Have you had your lunch" मी उगाच समोरच्याला कम्फर्टेबल फिल करवायचा प्रयत्न केला. त्यानं नाही म्हटलं असतं तर मी त्याला "जा दोन घास खाऊन घे" असं मुळीच म्हणणार नसतो! कोणतंही उत्तर चालू शकेल असा तो एक प्रश्न असतो परंतु काहीजण त्याचंही उत्तर फार सीरियस होऊन देतात.. जसं की आज उपास आहे, सकाळचा नाश्ता कसा भरपेट होता वगैरे! ज्याचा त्याचा प्रश्न! साला हा ए सी पण ना.. ही उरलेली कॉफी पण गारढोण होऊन गेली!
--X-O-X--
"एक्स एल डायनेमिक? कसली कंपनी आहे ही? सब प्राइम मॉरगेज पहिल्यांदा ऐकतोय मी" मी म्हटलं. "तुला काय करायचंय? तीन लाखाचं पॅकेज देतेय. एवढा पगार देत असतील तर मी दरवाजात उभा राहून येणाजाणाऱ्याला सॅल्यूट मारायला पण तयार आहे!" मित्राने ऐकीव माहिती सांगितली. मी घाईघाईने आमच्या कम्युनिकेशन सेंटर कड़े गेलो.. तुडुंब गर्दी होती. कमी मार्क्सचा क्रायटेरिया आणि ज्यांचं फ़क्त एका कंपनीत सिलेक्शन झालं आहे त्यांना बसण्याची संधी यामुळे एवढं पब्लिक जमलं होतं! इथं माझं एका कंपनीशी जमता जमत नव्हतं आणि हि आधी कुठे ना कुठे सिलेक्ट झालेली मुलं जास्त पैशाच्या आशेने इथंही गर्दी करत होती!
एप्टीट्यूडसाठी तीन चार क्लासरूम्स भरून मुलं होती. आधी म्हटलेली काही अलरेडी प्लेस् झालेली मुलं आणि बाकीचा सगळा उरलेला कचरा.. माझ्यासकट! त्यातून कंपनीने एक क्लासरूम भरेल इतकी मुलं सिलेक्ट केली! त्यांची बिझनेस कॉम्प्रिहेन्शनची टेस्ट झाली. ही टेस्ट म्हणजे अक्षरशः तीन पानांचा इंग्लिशचा पेपर होता. असली टेस्ट कोणीच घेतली नव्हती आतापर्यंत. त्यात शॉर्टलिस्ट होणाऱ्यांची नावं दुसऱ्या दिवशी जाहीर होणार असं सांगितलं गेलं.
दुसऱ्या दिवशी एका मित्राचा फोन आला की कॉलेजच्या गेटवर शॉर्टलिस्टेड मुलांची नावं लागली आहेत. मी चकितच झालो! पोरांच्या इज्जतीचे वाभाडे डायरेक्ट कॉलेजच्या वेशीवर? असं कसं कोणी करेल?
उत्तरार्ध:
उत्तरार्ध: