मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

कॉम्प्लीकेटेड : उत्तरार्ध


  
मी सगळं म्हणजे बरचसं सांगितलं जे काही एलीस मला सांगायची त्यापैकी बरचसं.. त्याच्या चेह-यावरचे भाव बदलत होते..तब्बल एक तास अखंड बडबड केल्यानंतर मी थांबलो.दरम्यान पोटात काहीतरी पडल्याने अजून जोर चढला होता.
"थोडक्यात तू तिचं वकीलपत्र घेऊन आला आहेस.." प्लेट मधला शेवटचा घास संपवत विरागने त्याचं मौन सोडलं.
"ते पण एका वकिलाशी भांडायला? मुळीच नाही..यू वोन्ट बिलीव्ह, मी तिच्याशी इतक्या वर्षांची घट्ट असणारी मैत्री तोडून आलोय..कायमची. हि ती एलीस नाहीये जिच्याशी मी मैत्रीचं नातं जोडलं होतं." विराग एकदम शांत झाला. खूप विचार करून त्याने शब्द जमवले. माझ्याशी बोलण्यासाठी तो तयारी करत होता हे मला जाणवलं.
"तू फक्त तिच्याच बाजूने विचार केलायस आत्तापर्यंत. आता माझी बाजूपण ऐक.."

विराग:
'एला आणि मी क्लोज आलो ते आमच्या गावांमुळे. आम्ही कितीतरी जणांना ओळखत होतो. "हि माहितीये का? याला ओळखतोस का?" असल्या बारीकसारीक चौकश्यामधून आमची फ्रेन्डशिप वाढली आणि घट्ट झाली. मी पण गावातून आलेलो. आमच्या इथे शाळेत 'मुलींशी बोलणं' म्हणजे पाप असल्यासारखी परिस्थिती. जरा कोणी बोलले कि चिडवाचिडवी सुरु! त्यात माझे बाबा वकील.म्हणून रेपो जपणंही मस्ट होतं. त्यामुळे पुण्यात गेल्यानंतर एखादी मुलगी स्वतःहून बोलतेय त्याचंच मला कोण कौतुक होतं. एला माझी ख-या अर्थाने पहिली "मैत्रीण" झाली. कित्ती बोलायचो आम्ही सुरुवातीसुरुवातीला.तिच्यामुळेच मी मुलींशी कसं बोलायचं, काय बोलायचं ते शिकलो. त्यानंतर त्याच शिदोरीवर ब-याच मैत्रिणी झाल्या पण त्यावेळी हि आयुष्यातली पहिलीच मुलगी. थोडा पझेसिव्हनेससुद्धा होता तिच्याबद्दल. त्यामुळे खूप काळजी करायचो तिची. कोणाशी ती जास्त क्लोज झालेली मला खपायची नाही. तिच्या सगळ्या गोष्टी ऐकायचो,इन द फिअर ऑफ लुजीन्ग हर as ए फ्रेंड. माझी बेस्ट फ्रेंड होती ती. तुला माहितीच आहे कसा स्वभाव आहे तिचा. ती माझ्यात गुंतत गेली. पण एका बाजूला मला जाणवत होता कि हे सगळं चुकीचं करतोय मी..तुला कदाचित माहित नसेल पण मी कधीच तिला प्रपोज नाही केलं. पण तिचं तिनेच सगळं गृहीत धरलं होतं.. मलाही कधी तिचा भ्रम तोडवासा वाटला नाही.."
"म्हणजे? तुझं कधी तिच्यावर प्रेम नव्हतंच? तिच्या सांगण्यावरून मी स्वतः तू पाठवलेले टेडी बेअर ,गिफ्ट्स कलेक्ट केले आहेत कुरियरच्या ऑफिस मधून, तिला पाठवलेले आय लव यू चे मेसेजेस.."
"ते तू वाचलेस? हि पोरगी काही पर्सनल ठेवत नाही.." विराग डिस्टर्ब झाला. त्याला एक कॉल आला."मी तुला नंतर कॉल करतो, व्हेअ आ यू? एम ऑन मागरथ रोड..ऑलराईट" अस काहीतरी बोलून त्यानं पुन्हा विचारलं "तू ते मेसेजेस वाचलेस?"
" चुकून वाचला मी तो. आणि एकच.. मला दुसरं काहीतरी चेक करायचं होतं तिच्या सेलवर, तेवढ्यात तुझा मेसेज आला आणि माझ्याकडून तो ओपन झाला.. बरं..ते आता महत्वाच नाहीये..पण त्याचा अर्थ काय?" मी सावरून घेतलं..

"सेईंग आय लव यू and बीइंग इन लव आर कम्प्लीटली डिफरन्ट थिंग्ज डूड.. मला तिला दुखवायचं नव्हतं.. दिवसातून दहा वेळा 'आय लव यू' म्हणायची, लाडाचे मेसेज पाठवायची, त्याला रिप्लाय देणं चुकीचं आहे का? दोघांनाही मेसेजेस फुकट ,कॉलिंग फुकट मग जोपर्यंत हे नुसतं चाललं होतं तोपर्यंत मी कशाला तिला हर्ट करू? मी पण पाठवायचो तिला तसलेच मेसेज. तिच्याच "आय लव यू " ला एडीट करून "आय लव यू टू" करायचो आणि तिलाच फॉरवर्ड करायचो. बोलतानाही तेच.. ती खुश होत असेल तर का करू नये? मला काय एक्स्ट्रा पैसे पडत नव्हते की माझी एनर्जी वाया जात नव्हती.गिफ्ट्सचं ही तेच.. सारखं मला "हे आवडतं, ते आवडतं" सांगायची मग एकदोनदा पाठवली  गिफ्टसपण.. पण ती जेव्हा संसाराची स्वप्न बघायला लागली,घरात असं करू आणि तसं करू; मुलगा झाला तर हे नाव ठेवू आणि मुलगी झाली तर ते नाव ठेवू वगैरे वगैरे.. तेव्हा तिला दिली ना मी जाणीव करून? उगीच लग्नाचं आमिष तर दाखवलं नाही?"
"साल्या.. इतकी वर्ष तिला खुश ठेवण्याच्या नादात तिच्या भावनांशी हवं तसं खेळून आता हे बोलतोयस तू? फॉर हर, इट वॉजन्ट जस्ट बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड रिलेशनशिप विराग,टू सेंड यू "आय लव यू " मेसेजेस.. अरे नवरा मानत होती ती तुला.म्हणून हे सगळं बोलायची ना ती? तिच्या सगळ्या फ्रेंड सर्कलला माहित होतं हे इन्क्लुडिंग मी.."

"मग मी काय करू?" विरागचा तोल ढळत होता..तेवढ्यात त्याचा फोन खणखणला.. "आय एम इन सिरीयस मिटिंग या..डोन्ट कीप ऑन कॉलिंग.. व्हॉट happened ? यू बेटर कम डाऊन टू गरुडा मॉल" त्याने फोन कट केला..पण त्या फोनमुळे तो मघापेक्षा जरा सावरला होता.तरीपण तोच टेम्पो राखत तो बोलायला लागला.. "हां.. सांग ना.. मी काय करू? करू तिच्याशी लग्न? ख्रिश्चन आहे ती. घरात घेतील तिला माझ्या? ती येईल? इंग्लिश बोलते ती जास्त..मराठी नाही.. होईल का adjust ? बरं पळून जाऊन करू लग्न, घरच्यांच्या विरोधात.. मग पुढे खायचं काय? तिच्या प्रेमाने पोट भरणार आहे का? तिला मायक्रोबायोलॉजीत रिसर्चच करायचा आहे. मी नवखा वकील. इथे जेमतेम स्वतःला पोसण्याइतक्या दमड्या कमावतोय. आमचं तुम्हा इंजिनियर लोकांसारखं नसतं, नोकरीला लागलं की महिन्याकाठी पैसे जमा! रेपो बिल्ड करायचा म्हणजे आयुष्य लोटतं.. बाबांनी रेप्युटेशन कमावून ठेवलंय.. चेंबर आहे त्यांचा तिकडे गावाकडे,माझ्यासाठीपण चेंबर उघडण्याची व्यवस्था केलीय त्यांनी, त्याचं काय करू? त्यांनी सांगून ठेवलंय..सून वकील म्हणजे वकीलच पाहिजे..इथे आमची दोघांची फिल्ड्स कम्प्लीटली वेगळी. कसं आणि काय पटवून देवू मी घरच्यांना? "
"अरे हे सगळं आधी कळत नव्हतं का तुम्हाला? मी वेळोवेळी जाणीव करून दिली होती कि नाही? तरीपण कशाला सगळ्यांना..."

"मी काय करू? बोल ना, सगळ्यांना माहितीये त्याला मी काय करू ? मी कध्धी माझ्या फ्रेंड सर्कलला सांगितलं नाही की 'एला आणि मी रिलेशनशिप मध्ये आहोत' म्हणून..तिलाच जगजाहीर करायची हौस होती तर त्याला मी काय करणार? तिने जरी आधी मला लग्नाबद्दल विचारलं असतं तरी मी तिला हेच सांगितलं असतं की "वी कॅनॉट कॅरी फॉरवर्ड धिस रिलेशन फॉर लाईफटाईम " पण तिने कधी विचारलंच नाही! सांगितलं ना,तिने स्वतःच गृहित धरल्या होत्या ब-याच गोष्टी म्हणून? आणि आमचे जे कॉमन फ्रेंड्स आहेत - तुझ्यासारखे - त्या सगळ्यांना तिनेच तर सांगितलंय हे.. कन्फर्म कर हवं तर! तिलाच हौस होती 'हा माझा बॉयफ्रेंड,हा माझा बॉयफ्रेंड' म्हणून मिरवायची! तिच्या ब-याचश्या मित्रमैत्रिणींशी मी बोलायचो,तुझ्याशी पण बोलायचो पण कधी तुला मी सांगितल्याचं आठवतंय, की 'एला इज माय गर्लफ्रेंड' म्हणून? जे काही नातं होतं ते पर्सनल ठेवायचं होतं मला पण तोंडात तीळपण भिजत नाही तिच्या.कित्ती वेळा सांगून झालं तिला हे..पण नाही! तिला वाटायचं की आपण त्या 'जब वी मेट' मधल्या त्या 'गीत' सारखे आहोत.."
"तिला 'गीत' सारखं वाटत होतं की काय वाटत होतं ते माहित नाही पण तू मात्र त्या 'गीत'च्या 'अंशुमन' सारखा निघालास हे नक्की! तुला माहितीये? तुझ्या स्वभावामुळे असेल किंवा वागणुकीमुळे असेल तिच्या मैत्रीणीना तू कधीच आवडला नाहीस; कदाचित त्यांनी तुला बरोबर जोखला असेल.. पण ती नेहमी तुझीच बाजू सावरून घ्यायची.. तिच्या फ्रेंड सर्कल मधला फक्त मी असेन जो नेहमी तुला सपोर्ट करत राहिलो.. कारण आय नो व्हॉट रिलेशनशिप इज..एनीवे मूर्ख होती ती एलीस, टू बी इन हर ओन wonderland.. आय डोन्ट फील पीटी फॉर हर.."

"हा..य.. ही आहे तुझी सिरिअस मीटिंग?" लांबून एका मुलीने आमच्या दिशेने येता येता विचारलं.
"हे. हाय.. धिस इज अनु.. अडव्होकेट अनुप्रीता, एकत्रच सनद घेतली आम्ही. शी इज माय कलीग, माय फ्रेंड.. "
"एम आय योर "जस्ट" फ्रेंड?" दोन हाताच्या दोन-दोन बोटांनी "जस्ट" भोवतीच्या डबल कोट्स दाखवत अनुप्रिताने विरागला विचारलं..आणि मला चटकन सगळ्याचा उलगडा झाला..अनुत्तरीत असणारी सगळी समीकरणं तिच्या त्या एका प्रश्नासरशी सुटली होती.. तिकडे दुर्लक्ष करत विराग ने माझ्याकडे हात करत म्हटलं..
"यू आर लॉट मोर than that अनु, बट फर्स्ट मीट माय व्हेरी गुड फ्रेंड फ्रॉम पुणे.."
"वी आर नो मोर फ्रेंड्स विराग.." मी म्हटलं आणि तिथून बाहेर पडलो.. रिक्षाने मी व्हीआरएल चं ऑफिस गाठलं आणि दुस-या दिवशी पुणे...

मी:
दोघेही चुकले, दुस-याला पटवण्यासाठी कोणा एकाची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नव्हता. वाईट वाटलं ते मी त्यांना ओळखण्यात चूक केली याचं.. पण आत्ता पटलं कि खोट्या नात्याला विनाकारण कुरुवाळत राहण्यापेक्षा एकटं असणं परवडलं.. बीइंग सिंगल इज अ लॉट वायजर than बीइंग इन राँग रिलेशनशिप!!  आल्या आल्या मी सेलमधून दोघांचेही नंबर्स डिलीट केले. शॉवरखाली बराच वेळ आंघोळ केली आणि वाहत्या पाण्याबरोबर दोघांबरोबर असणा-या माझ्या सगळ्या आठवणी वाहून जाऊ देण्याचा असफल प्रयत्नही केला.

मोबाईलच्या मेसेज रिंगटोन ने मला भूतकाळातून वर्तमानात आणलं. कसलातरी डिस्काउंट की ऑफर चा  फालतू मेसेज आला होता.. विचार झटकण्याचा प्रयत्न करत, खुर्चीतून उठून मी समोर पडलेलं इन्व्हिटेशन कार्ड उचललं आणि एकटक त्या चमकणा-या अक्षरांकडे पाहत बसलो..असो.. दोन वर्षानंतर का होईना पण शेवटी हेच खरंय कि एलीसचं लग्न ठरलंय..अ प्युअर अरेंज्ड marriage!

७ टिप्पण्या:

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. पार्टनर ...कथा मस्त च जमून आली आहे नेहमीप्रमाणे ....चर्चा च नाही !!
    आता जरा विश्लेषण ...
    कथे चा शेवट अगदी म्हणजे अगदी म्हणजे अगदी च साचेबद्ध आणी ऐकलेला झाला आहे.
    जो लेखका च्या प्रतिमे ला आणी प्रतिभे ला न शोभणारा आहे.
    पात्रा परिचय खतरनाक एकदम ...एला डोळ्या समोर उभी केली आहेस
    पण महत्वा चा पात्रा म्हणजे सूत्रधार म्हणजे "मी" ...फार काही न बोलता फक्त अंघोळ करून कल्टी मारतो ...
    पटला नाही बुवा ...जरी विचार करण्या ची जवाबदारी वाचका वर सोडली असलीस तरी काही दिशा मिळत नाहीये

    तुझा मित्रा आणी एक फुकट्या वाचक ,
    रघुराज

    उत्तर द्याहटवा
  3. hmmm its like "ADJUSTMENT WID RITE PPL IS ALWAYS BETTER THAN ARGUMENT WID WRONG ONES!!!pan tu frndshp todayla nako hotis after all they were ur frnds...(kalpanik ka asena)overall good n virag cha thoda raag suddha yetoy:-p..
    gdtc

    उत्तर द्याहटवा
  4. रघू, रोहन आणि सुधा
    प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.. आता थोडं विवेचन.. शेवट साचेबद्ध केलेला आहे. कारण मला एकजण बरोबर आणि दुसरी व्यक्ती चूक असं मांडायचं नव्हतं. सूत्रधार म्हणजे "मी" ने स्वतःचं मत व्यक्त केलं तर ते थोड बायस्ड होईल आणि वाचकाला दोघांपैकी एकाच्या बाजूला इन्क्लाईन करेल अशी भीती वाटली म्हणून 'मी' ला जास्त विचार करायची संधी दिली नाही मी..'विचार करण्याची जवाबदारी वाचकावर सोडली' हे जाणवतंय हे मला यश वाटतं. जसा सुधा ला विराग चुकीचा वाटला आणि तिने तात्पर्य काढलं तसं वाचकाने आपलं मत बनवावं.. आपल्या डिटेल परिक्षणाबद्दल मनापासून आभार.. पुढील लिखाणात त्रुटी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेन..

    उत्तर द्याहटवा
  5. बीइंग सिंगल इज अ लॉट वायजर than बीइंग इन राँग रिलेशनशिप!! Mastch

    उत्तर द्याहटवा
  6. @गिरीश : अगदी valentine day चा मुहूर्त साधून प्रतिक्रिया दिली आहेस! हा हा.. आभारी आहे..

    उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!