![]() |
एलीसचं लग्न ठरलंय..अ प्युअर अरेंज्ड marriage !! माझ्या टेबलवर आयव्हरी रंगांच्या कागदावर गोल्डन रंगात अक्षरं चमकत होती.. 'एलीस वेड्स ऑल्वीन ...द ब्राईड and ग्रूम होस्ट द वेडिंग.. द ऑनर ऑफ योर प्रेझेन्स इज रिक्वेस्टेड at द marriage ऑफ.... ' मला पुढे वाचवेना.. मी डोळे मिटले..मन झरझर मागे गेलं. तब्बल दोन वर्ष! स्मृतीपटलावरून काही गोष्टी खोडाव्याश्या वाटल्या तरी पुसून टाकता येत नाहीत..
"बट वी ब्रोक अप बाय म्युचुअल understanding .. " दीड दोन तासांच्या माझ्या समजावणीनंतर ती पुन्हा म्हणाली आणि फ्रायडे इव्हिनिंगच्या माझ्या मूडचा पूर्णपणे सत्यानाश झाला!
"काय? ब्रोक अप बाय 'म्युचुअल understanding '? एलीस.. अगं.. 'ब्रोक अप' आणि 'म्युचुअल understanding ' या दोन फ्रेझेस कॉन्ट्राडीक्टरी आहेत असं वाटत नाही तुला? जर तुम्हा दोघात थोडं तरी 'म्युचुअल understanding ' असतं तर इतक्या वर्षांनंतर ब्रेकअपची वेळ आली असती का?"
"व्हॉटेव्हर... बट वी आर नो मोर टुगेदर..and वी कॅनॉट बी..व्हाय आर यू हर्टीन्ग योर्सेल्फ?"
"बिकॉझ यू बोथ आर माय फ्रेंड्स.. and आय विटनेस्ड इट.. मला माहितीये बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असणं म्हणजे स्टेटस सिम्बॉल झालाय. तसं रिलेशन असण्यात गैर काहीच नाहीये पण वाटेल तितके दिवस मजा करायची आणि मन भरलं कि एकमेकांना डच्चू द्यायचा जो ट्रेंड रूढ होतोय ना...."
"माईंड योर.. सॉरी.. बट यू ऑल्सो आर हर्टीन्ग मी...कंट्रोल योर इमोशन्स."
"देअर विल बी नो नीड ऑफ इट हेन्सफोर्थ..धिस इज अवर लास्ट talk . वी आर नॉट इव्हन फ्रेंड्स एनिमोर एलीस. आय हेट पीपल लाईक यू" मी तिथून निघून आलो.
मी डोळे उघडले.. दोन वर्षांपूर्वीचे ते दोन दिवस विसरायचे आहेत मला... मी माझे दोन खूप चांगले फ्रेंड्स गमावले आहेत त्या दिवसात. अगदी ठरवून! आणि हो.. माझा प्रत्यक्ष संबंध नसतानादेखील. मी पुन्हा डोळे मिटले..खुर्चीत थोडा जास्तच रेलून बसलो..
त्या फ्रायडेला रात्रीच मी विराग ला कॉल केला होता...
"विराग.. अरे काय चाललंय तुमचं?"
"कोणाचं? कशाबद्दल बोलतो आहेस?" त्यानं विचारलं.
"उगीच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. आय वॉन्ट टू मीट यू..मला तुला भेटायचंय.."
"कसं भेटणार? मी इथे बंगलोरला तू पुण्यात..मी रात्री कॉल करतो. skype वर बोलू फेस टू फेस"
"नाही... आपण प्रत्यक्ष भेटू शकतो..मी येतोय बंगलोरला.--उद्याच"
"क्काय? आर यू नट्स? नथिंग that मच सिरीयस man .. इट्स बिटवीन मी एन हर.. आय नो यू आर हर--रादर our गुड फ्रेंड..बट.."
"मी विजयानंदचं तिकीट बुक केलंय आता ऑनलाईन..उद्या सकाळी मी पोचतोय.मग सांग हे सगळं"
विरागने सुस्कारा सोडला.. "बरं.. ये. पोचलास कि सांग..मी येतो पिक करायला."
उशिराची बस असूनही मला झोप येत नव्हती.. एकेकाळी दोघेही चांगले फ्रेंड्स होते माझे.. खरतर बियॉंण्ड फ्रेंड्स आहेत ते.. काही वर्षांपूर्वी बारीकसारीक गोष्टींमध्ये ,निर्णयांमध्ये त्यांचं मत महत्वाचं होतं. जॉब सुरु झाला आणि बरीचशी समीकरणं बदलली. पण दोघांचं नातं तसंच राहिलं. किंबहुना दृढ झालं. माझीच दृष्ट लागली कि काय? आणि आता जे नातं वाचवायची मी पराकाष्ठा करतोय त्यांना खरंच ही गरज आहे का?
एलीस:
एलीस काही वेळासाठी माझ्याबरोबर एका मेसमध्ये होती.काहीवेळा आणि काहीजणांशी मैत्री व्हायला कारणं लागत नाहीत. बोलणं कसं सुरु झालं ते आठवत नाही पण जेव्हा मैत्री नवीन होती तेव्हा पासून आमचं जे ट्युनिंग जुळलं होतं ते शेवटपर्यंत - अगदी त्या शुक्रवारपर्यंत तसंच होतं. विरागची आणि माझी ओळख आधी 'मैत्री' वगैरे म्हणण्याइतकी नव्हती. एलिसनेच एकदा एका मल्टीप्लेक्समध्ये की कुठेतरी 'तिचा मित्र' अशी ओळख करून दिली मग आमचं बोलणं वाढलं आणि मैत्रीपण झाली पण तरी त्यावेळी एलीस आणि माझ्या मैत्रीइतकी ती 'गेहरी' नक्कीच नव्हती.तो तिच्या जवळपासच्या गावातलाच होता. मोठ्या शहरांमध्ये घराजवळचं जरी नसेल तरी गाव, तालुका अगदी जिल्ह्यातलं जरी कोणी भेटलं तरी आपलेपणा वाटतो आणि जवळीकही वाढते.
"काय रे..मेसवर यायच्या आधी फोन करायला सांगितलाय ना तुला.. इफ यू आर नॉट देअर, देन अलोन आय have टू इट.." तिने एकदा तक्रार केली.
"मी काय करू? बघावं तेव्हा तुझा फोन बिझी असतो. मला भूक लागते. आणि काय गं हल्ली कोणाशी बोलत असतेस इतका वेळ ? "
"विरागशी"ती बोलून गेली आणि मग तिने जीभ चावली..
"ओ हो.. हम्म.. प्रेमात-बिमात पडलीयेस कि काय त्याच्या?" मी खिजवायला विचारलं..
"आय थिंक येस!" एलिस चक्क लाजली!
"काय? खरंच? कसं काय?" मी जवळ जवळ ओरडलोच!
"अरे हळू..केवढ्याने ओरडतोस?" तिने इकडे तिकडे पाहत विचारलं..
"मला सांगणारेस तू.. ते पण आत्ताच्या आत्ता." माझी एक्साईटमेंट आणि कुतूहल मला लपवता येईना..
अर्धा पाऊण तास सगळं कसं झालं, काय झालं, कधी झालं ते सांगितल्यानंतर ती म्हणाली,
"आय थिंक ही इज द वन आयेम लुकिंग फॉर.. कित्ती केअरिंग आहे.. admirable टू.. ही इज टू मच लविंग या.. सतत माझी चौकशी करत असतो.. खाल्लं का? , जेवलीस का? बरं नसलं तर डॉक्टरकडे गेलीस का पासून गोळ्या घेतल्यास का पर्यंत.. व्हाय शुडन्ट आय फॉल फॉर हिम? इन fact व्हाय शुडन्ट एनी गर्ल फॉल फॉर हिम? " दुर्गा कॅफेच्या समोर उभा राहून मी तिची कथा ऐकत होतो.. माझा एक्साईटमेंटचा भर एव्हाना ओसरला होता.
"गुड या.. यू have फाउंड द वन यू आर लुकिंग फॉर.. आएम happy फॉर यू. . पण भविष्याचा विचार केला आहेस? इथे वेगवेगळ्या जातींमध्ये लग्न होताना नाकीनऊ येतात तुमचे तर धर्म वेगळे आहेत. "
"देखेंगे यार.. मला तो आवडतो,त्याला मी आवडते मग झालं ना?"
"हो.. शेवटी मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी.. हो कि नाही?" आम्ही दोघेही खळखळून हसलो..
"बरं.. त्याने तुला प्रपोज कधी केलं? एवढी बडबड केलीस पण ते तर सांगितलच नाहीस" मी म्हणालो.
"कुठे केलंय अजून? पण समजतं ना..आणि रिलेशनशिप स्टार्ट व्हायला प्रपोज करायलाच हवं का? ते सगळं सिनेमात वगैरे असतं रे..ए पण तू केलं होतंस ना रे प्रपोज?"
"हो मग? अर्थातच..म्हणून तर विचारलं.. अगं मी केलं आणि आपल्याला होकारच द्यायचा आहे हे माहित असूनही तिने किती वेळ घेतला होता सांगितलंय ना मी तुला?" मी म्हटलं..
"हो.. बोलला होतास तू कि तेरा चैन खो गया था.. तेरी रातों की नींद लुट गयी थी..एट्सेट्रा !" आम्ही पुन्हा एकदा हसलो.
एलिसचं पहिल्यापहिल्यांदा जाणवण्याइतपत चालणारं विरागस्तवन नंतर माझ्याही अंगवळणी पडलं..त्यानंतर मी आणि विरागपण आधीपेक्षा क्लोज आलो. विरागला एलीसबद्दल काही बोललं कि तो फक्त हसायचा..
पण मी त्याच्या जितका जवळ येत गेलो तितका मला दोघांच्या स्वभावातला फरक जाणवत गेला. विराग एकदम मितभाषी, त्याच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये असणारा, करीअर ओरिएन्टेड, समाजाचा विचार करणारा, सगळ्यांशी अदबीने वागणारा आणि रिझर्व्हड याउलट एलिस कुणाशीही पटकन बोलायला लागणारी, अनोळखी लोकांमध्येही लगेच मिक्स होणारी, त्यांनादेखील आपलसं करणारी, भविष्याचा जास्त वेध न घेणारी, सडेतोड आणि स्वच्छंद जगणारी, 'माय लाईफ इज ओपन बुक' प्रकारची.. दोघंही दोन प्रकारचे..बंध कसे जुळले कळत नाही बुवा. अश्या कित्येक जोड्या आपण पाहत असतो आणि म्हणतोदेखील "काय पाहिलं तिने त्याच्यात काय माहित?" किंवा "त्याला ती कशी काय बुवा आवडली, कोणास ठाऊक? " तर ही जोडी त्यातली,विसंगत.. दोघांच्या उंचीत डोळ्यांना स्पष्ट जाणवण्याइतका फरक, तो गव्हाळ आणि ती अतिप्रचंड गोरी, ती जास्त नाही पण थोडीशी हेल्दी आणि तो ठीक ठाक..आवडीनिवडीत तर प्रचंड तफावत.. म्हणजे जेवणखाण तर सोडाच पण अगदी कपडे जरी घेतले तरी ती कॅज्युअल वेअरची भोक्ती आणि हा फॉर्मल्सचा fan! फॉर मी इट वॉज अ परफेक्ट mis-match!! आणि हो,तो बंगलोरला आणि ही पुण्याला! पुण्यातल्या बीकॉम नंतर लॉ करण्यासाठी तो बंगलोरला गेला, 'बंगलोर इंस्टीटयूट ऑफ लीगल स्टडीज' की कुठेतरी आणि हिला तिच्या बीएस्सी मायक्रोबायोलॉजीनंतर त्यातच काम आणि रिसर्च करायचा होता त्यामुळे ती पुणे युनिवर्सिटीतच राहिली.
सगळं सुरळीत चाललं असताना एकदा आम्ही भेटलो. मी आणि एलिस. माझ्यावरून सुरु झालेला चिडवाचिडवीचा विषय विराग वर येवून थांबला.. एलिस एकदम गंभीर झाली.
"त्याला मी कोणाशी बोललेलं नाही आवडत.."
"याला पझेसिव्हनेस म्हणतात.. मुलांना एक भीती वाटत असते कि ही आपल्यावर इम्प्रेस झाली तशी इतर कोणावर झाली तर!!" मी हसत हसत म्हटलं.
"मला आवडायचा त्याचा पझेसिव्हनेस पण..."
"पण काय?"
"...त्याला मी तुझ्याशीदेखील बोललेलं आवडत नाही."
"क्काय?" इट वॉज अ शॉक फॉर मी..!
"याला पझेसिव्हनेस म्हणतात? असला कसला पझेसिव्हनेस? हि नोज,यु आर माय बेस्ट बडी.."
"असतो अगं एकेकाचा स्वभाव" मी सावरून घेतलं " बोलेन मी त्याच्याशी यावर.. आणि तू एक काम कर. उगीच माझ्याबद्दल सांगत जाऊ नकोस त्याला काही. आता आपण पुण्यात आहोत म्हणजे भेटणं बोलणं तर होणारच ना आपलं? आणि आपली मैत्री तुमच्या रिलेशनपेक्षा जुनी आहे. मी स्वतःही कमीटेड आहे निदान त्याचा तरी विचार करायचा त्याने. पण असो..मी बोलेन त्याच्याशी"
"मी बोलले म्हणून सांगू नको अदरवाईज.. "
"नाही गं.. तेवढं कळत मला. बरोबर विषय काढेन मी.."
"प्रश्न ट्रस्टचा आहे. तू तुझ्या रिलेशनशिपमध्ये असा डाउट घेत असतोस? किंवा ती घेते? आता तिचा कॉल होता तेव्हा तू तिला माझ्याबरोबर आहेस असं सांगितलंस,बरोबर? 'ठीकाय' म्हणून तिने फोन ठेवला."
"तुला 'हाय' पण सांगितला ना.."
"तेच रे.. पण काय करतोयस तिथे, तिच्याबरोबरच कशाला आहेस,कुठे फिरताय वगैरे विचारलं का तिने?"
"तेव्हढी understanding आहे आमच्यात .."
"that इज व्हॉट.. ही निड्झ an एक्सप्लेनेशन and that टू ऑन द स्पॉट. मी मैत्रिणी बरोबर असले आणि तसं सांगितलं तरी त्यांचा आवाज ऐकवावा लागतो, घरी असले तर पेरेंट्सचा.. सुरुवाती सुरवातीला मस्त वाटायचं कि समबडी इज केअरिंग फॉर मी सो मच पण आता ते बंधन वाटतंय.."
"सवय होईल गं..आणि पहिल्यांदा सगळं त्याला सांगायचं थांबव.."
"द प्रॉब्लेम इज आय कान्ट.. आय जस्ट कान्ट! हि वूड बी माय बेटर हाफ इन लीटरल सेन्स. आय शेअर इच and एवरी स्मॉल थिंग विथ हिम.. आता मी कुठेय,काय करतेय इथपासून माझ्या सगळ्या पर्सनल गोष्टी. इतक्या पर्सनल की यू कान्ट imagine ! सगळं म्हणजे अगदी सगळं.. आता युनिवर्सिटीतले रस्ते सुद्धा पाठ झालेत त्याचे.." शुष्क हसत ती म्हणाली..
"हे बघ,तो आहे तो असा आहे.. मग आता कुठेतरी कॉम्प्रमाईज करावं लागेलच ना? आता त्याच्याशी इतकं आणि एवढं 'सगळं म्हणजे सगळं' शेअर करतेस म्हटल्यावर आणि महत्वाचं म्हणजे तोही हे' सगळं म्हणजे अगदी सगळं' ऐकून घेतो म्हणजे यू बोथ मस्ट बी टू मच सिरीयस अबाउट इच अदर, राईट?"
"आय थिंक सो..at least आय एम..मी त्याला हजबंड मानते रे, अजून काय हवं?"
"यू विल गेट युज्ड टू ऑफ इट..शेवटी नर्चरिंग रिलेशन इज डूइंग सम adjustment and कॉम्प्रमायजिंग ऑन फ्यु थिंग्स..कारण आफ्टर ऑल एवरी रिलेशन कान्ट बी परफेक्ट. आणि पुन्हा एकदा सांगतो, असं हे सगळं सगळ्यांना सांगायचं थांबव"
"सगळ्यांना म्हणजे? यू आर माय बेस्ट फ्रेंड"
"असेन पण बॉयफ्रेंड्स हेट देअर गर्ल्स बेस्ट फ्रेंड्स, हू आर बॉय्ज, दो दे डोन्ट शो इट! आस्क मी!! तो आणि तू काय बोलता, काय काय शेअर करता याच्याशी माझं किंवा इतरांचं काय देणं घेणं ? कशाला सांगायचं त्यांना? इफ यू कान्ट कीप योर सिक्रेट्स, डोन्ट एक्स्पेक्ट अदर्स टू कीप देम.. अंडरस्टूड? "
मी:
"गाडी पांच मिनट रूकेगी, चाय पानी के लिये और बाथरूम जानेका है तो लोग उतर सकते है.." रात्री उशिरा गाढ झोपलेल्या लोकांची जबरदस्तीने झोपमोड करणा-या क्लीनरच्या कर्कश्श आवाजाने माझी तंद्री भंग पावली.
कोणासाठी करतोयस हे सगळं? काय गरज आहे तुला? व्यक्तींसाठी की त्या एका नात्यासाठी? विचारांची चक्र काही थांबायला तयार नव्हती. रात्री खूप उशिरा मला झोप लागली.
बंगलोर मध्ये मी उतरलो तेव्हा दुपार होत होती. कबूल केल्याप्रमाणे विराग पोचला होता..
"फ्रेश होणारेस?"
"नुसता चेहरा धुवेन.. वॉल्वो मध्ये प्रवासाचा थकवा अजिबात जाणवत नाही..त्यात एग्झीक्यूटिव्ह सीट मिळाली होती. झोप पण मस्त झाली"
"वाटलंच.. कारण वाटत नाहीये तुझ्याकडे बघून की तू एवढा प्रवास करून आला आहेस.."
मागरथरोड वरच्या गरुडा मॉल मध्ये एका फारशी गर्दी नसणा-या रेस्टोरंट आम्ही स्थिरावलो. विराग कसलीतरी ऑर्डर देवून आला.. मला त्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता.
"बोल.." मी बोललो.
"कशाबद्दल आणि काय? तुला काय अपेक्षित आहे माझ्याकडून?"
"पुस्तकी प्रश्न विचारू नकोस, डायरेक्टली कमिंग टू द पॉइन्ट, व्हाय डिड यू डीसाईड टू ब्रोक अप? "
"ऑलऱाईट.. लेट्स स्टार्ट ऑन इट.. व्हॉट डू यू नो अबाउट our रिलेशन?" त्याने विचारलं




