पूर्वार्ध:
"डेटिंग? म्हणजे काय असतं? तीच मला म्हणाली की.."
"सो..यु डोन्ट नो व्हॉट डेटिंग इज..तिने घरी सांगितलं की कॉलेजच्या ग्रुप बरोबर ती मुव्हीला चालली आहे."
"अगं, हि काय इश्यू करण्यासारखी गोष्ट आहे का? मागे 'आरएचटीडीएम' ला सुद्धा आम्ही दोघेच आलो होतो.." मला अवघडल्यासारखं व्हायला लागलं..
"तेव्हा तुम्ही खूप लहान होता म्हणून मी काही बोलले नाही.. आता तुम्ही लहान नाही.."
"काय बोलतेयस तू चिंगी? मागच्या वर्षीची तर गोष्ट आहे ही.. एका वर्षात एवढे मोठे झालो का आम्ही?" मी विचारलं.
"हाय दीदी" गुड्डू आली आणि तिने मुव्हीचं इतकं प्रचंड कौतुक केलं की चिंगीला तो विषय नाईलाजाने तिथेच सोडावा लागला. पण तिची रोखून पाहणारी नजर मला सतत छळत राहिली..
माझं द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि गुड्डूची बारावी या दोन्ही परीक्षांच महत्व आमच्या लेखी तितकंसं नसल्याने त्या काळात आमची मैत्री अधिक खोल होत गेली. त्यातच माझ्या हातात मोबाईल आला.. १२ रुपये पर मिनिट इनकमिंग वरून कॉल रेट्स ५० पैसे पर मिनिट इनकमिंगपर्यंत घसरले होते आणि वरून भविष्यात इनकमिंग फ्री होणार अशी वदंताही होती..
"कशाला पैसे उधळतोस? एवढ्या पैशात काय काय करता आलं असतं माहितीये?"
"असू दे..शायनिंग मारायला घेतला आहे. मी उचलत नाही कॉल्स. फक्त घरचेच उचलतो! माझ्या आणि तुझ्या.करत तर नाहीच नाही!! आणि बाकीचे फालतूचे खर्च कट ऑफ केले आहेत मी."
ती खळखळून हसली..
".." मी शांत बसलो.
"काय झालं ? अचानक असा का केलास चेहरा?" तिने विचारलं.
"चिंगीला आपल्या भेटण्यावर अजूनही ऑब्जेक्शन आहे का? तिला सांग कि देअर इज नथिंग फिशी"
"सोड रे.. आपल्याला माहितीये ना ते? मग झालं तर. आणि हे बघ.. तुला चिंगीबद्दल काही वाटत असेल तर व्हाय डोन्ट यू टेल धिस टू माय पेरेंट्स? " ती म्हणाली.
माझ्या मनात तिच्याबद्दल काही फीलींग्ज होत्या कि नव्हत्या हे मला स्पष्ट सांगता येत नव्हतं.आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काही फीलींग्ज होत्या कि नव्हत्या हे मला कळत नव्हतं.
तिचे बारावीचे रिझल्ट्स चांगले आले होते पण हल्ली सगळं सीईटी वर अवलंबून असतं.
"ए चम्या, माझे सी ई टी चे रिझल्ट्स आलेत. लेडीज रिझर्वेशनमधून कुठल्या पण इंजिनियरिंग कॉलेजला अडमिशन मिळू शकतं. पण मला नाही करायचं. मम्मीपप्पांच्या खूपच एक्स्पेक्टेशन्स आहेत रे.." तिने तिच्या पहिल्या मोबाईलवरून मला ही बातमी दिली..
"पहिल्यांदा मला चम्या म्हणायचं बंद कर यार..आणि सांग ना त्यांना कि तुला एयर होस्टेसच व्हायचं आहे म्हणून.." मी म्हटलं..
"चम्या यार, तुला कळतं हे सगळं..त्यांना कसं समजावू? तू येशील का या सनडेला? मी नसताना तू त्यांना भेट. प्लीज याSSS प्लीज.." तिने गळ घातली. यावेळेला मात्र मी तिचं "व्हाय डोन्ट यू.." चं साकडं ऐकायचं ठरवलं!
मी गेलो.. टिपिकल कान्देपोह्याचा नाश्ता झाल्यावर मी इकडून तिकडून विषय वळवत सफाईने गुड्डूच्या करिअरबद्दलच्या विषयाला हात घातला.आईचा प्रचंड विरोध सुरुवातीपासूनच जाणवत होता. काका निर्विकार भाव चेह-यावर आणून बसले होते.
"काकू,अहो लाखांमध्ये कमावेल ती. वरून प्रेस्टीज आहे ते आहेच. तुम्हाला पण बेनिफिट्स आहेत."
"आम्हाला नकोत ते पैसे.. आम्हाला ती इथे पाहिजे. लहानपणापासून तिला सांभाळलं. आणि हि म्हणते आता हिला एअर होस्टेस व्हायचंय. किती रिस्की आहे ते.. हल्ली कित्ती बातम्या येतात विमानांच्या एक्सिडन्टच्या.." त्यांचा आवाज कातर झाला.
"अहो काकू.." मी काकांकडे मोर्चा वळवला.." काका..तुम्हीच सांगा शेवटचा विमान एक्सिडन्ट झाल्याची बातमी कधी वाचलीयेत तुम्ही?" काका शांत बसले..थोडा वेळ असाच शांततेत गेला.
"पण राजे.. कशासाठी वेगळा रस्ता चोखाळायचा? तुझ्यासारखी इंजिनियर बनली तर आमच्या डोळ्यासमोरच राहील ना?" विचार करून ते बोलले.
"काका,काकी अहो एवीतेवी लग्न झालं की जाणारच आहे ना ती तुमचं घर सोडून? मग आधीच करूदेत ना तिला काय करायचंय ते. सपोज नाही जमलं तिला तर परत तुमच्याचकडे येईल ना ती? आणि तुम्ही तिला माझ्यापेक्षा जास्त ओळखता. तिचा हट्टी स्वभाव तुम्हालापण माहितीये. नाही म्हटलंत तरी ती करणार आणि अगदीच जरी नाही केलं तरी शंभरदा तुम्हाला ते ऐकून दाखवणार. हो की नाही? वरून सपोज नवरा किंवा सासर ऑर्थोडॉक्स निघालं तर आयुष्यभर हि सल तिच्या मनात राहील की 'तेव्हा आई बाबांनी परमिशन दिली असती तर..' तुम्हाला ते आवडेल का ?"
"आता तू इंजिनियर होणार आहेस म्हणून हे बोलतोयस.." काकू म्हणाल्या.
"अहो काकू, मला बाकीचे पर्याय माहितीच नव्हते. मी लहानपणापासून पुण्यात किंवा इतर कुठल्याही मोठ्या शहरात असतो तर कदाचित मी दुसरं करीअर निवडलं असतं..पण मुळात मला आवड होती आणि तिला ती आवड नाहीये हे सत्य स्वीकारायला हवंच. ती इंजिनियरसुद्धा बनेल पण तिच्या इच्छेविरुद्ध.जे तिलाच काय तुम्हालापण नाही आवडणार!"
घरातून बाहेर पडता पडता मी गुड्डूला फोन केला.
"गुड्डू, कुठेयस?"
"जिम.."ट्रेडमिल वर ती धावून धावून लागलेली धाप मला ऐकू येत होती..
"घरी बोललो मी तुझ्या..."
"मग?.."
"बोथ आर कन्वीन्स्ड !!"
"..."
"ऐकलंस का?"
"ये SSSSS ..यू आर द man.. लव यू चमू..thanks thanks अ लॉट. तू पराग ला ये..तुला पार्टी!!" ती प्रचंड एक्साईटमेंट मध्ये होती.
लाल बहादूर शास्त्री मार्ग अर्थात एटी फिट रोडवरच्या हॉटेल पराग गार्डनला फुकटात मिळालेल्या दोन आलू पराठ्यांचा फन्ना उडवताना मी तिला तिच्या घरची स्टोरी ऐकवली. तिचा चेहरा प्रचंड खुलला होता आणि डोळ्यातून कृतज्ञता ओसंडून वाहत होती
"frankfinn ची चौकशी करून आलेय मी, एविएशन,हॉस्पिटलीटी आणि travel management चा डिप्लोमा करू शकते मी. माय personality सूट्स फॉर इट.."
"ओह ओके..सो जिम बीम त्यासाठीच की काय?" मी विचारलं
"चल रे..ते माझ्यासाठीच. तुला काय वाटतं? मी आपोआप मेंटेन राहते?"
"मी एवढा विचार कधी नाही केला.. आणि तुझ्या फिगरचा तर नाहीच नाही!"
"मग कर आता.. स्वतःला ग्रूम करण्यात वाईट काय आहे? माणसाने नेहमी प्रेझेंटेबल दिसावं. मुलगा असो किंवा मुलगी."
"ग्रूम म्हणजे? हे असं आतमध्ये घालायचं बाहेर दिसलं आणि पायात घालायच्या कपड्यांनी पायाचा शेप दाखवला की ग्रुमिंग झालं का?" मी तिला डिवचायला बोललो.
"एक्स्युज मी !! त्याला हॉल्टर नेक म्हणतात and धिस इज लेगीन्स!!" ती सांगायला लागली..
"सोड यार.. हे बघ,माणूस त्याच्या अंगातल्या गुणांनी प्रसिद्ध पावतो. गांधीजी बघ. नुसता पंचा नेसून असायचे.."
"तू गांधीजी आहेस का?"
".." मी गप्प बसलो.. काहीजणांशी वाद म्हणजे बाष्कळ बडबड असते!
"ओह गॉड !! डोन्ट मेक फेसेस..लेट मी एक्स्प्लेन.. बरं.. नॉर्थ साईड ची मुलं बघितलीस? कशी राहतात? अप टू डेट असतात की नाही? आपल्या महाराष्ट्रीयन मुलांनाच कंटाळा का असतो ते कळत नाही. तू तसा राहायला लागल्यावर लोक तुझ्याशी हिंदी बोलायला लागतात!! नोटीस कर हवं तर... कारण मराठी मुलगा असा छान राहू शकतो यावर इथल्या कोणाचाच विश्वास नाहीये. पिक अप नाईस आउटफिट्स, ट्रिम हेअर्स नाईसली..डू पिअर्सिंग इफ नीडेड! चांगल राहावं,चारचौघात इम्प्रेसिव्ह दिसावं हे आपल्या लोकांना कधी कळणार काय माहिती? इतरांना कशाला? माझ्या पुढ्यात बसलेल्या चम्याला जरी ते कळलं तरी मला पुरे!! "
"असू दे.. मी स्वतःचं स्वतः कमवायला लागलो की करेन ग्रूमिंग.. डोन्ट वरी.. आता पुढे काय करणार आहेस?"
"appointment आहे माझी शिला'जला, इथे सागर आर्केड मधेच आहे. काही नाही..आयब्रोज आणि रेग्युलर क्लीनअप. भारी आहे ती.इतक्यावेळा गेलेय पण, तुला सांगते, एकदापण स्कीनवर rash उमटला नाहीये अजूनपर्यंत!!" मी डोक गच्च धरलं!! कधी कधी मी गुड्डूला का सहन करतो हा प्रश्न मला प्रचंड छळत असे!
"माझ्या माते..पुढे काय करणार म्हणजे घरी मम्मी पप्पांना या कोर्सबद्दल कधी सांगणार आहेस?" मी विचारलं.
"देखेंगे! अब तू है तो फ़िक्र नहीं! चल, सध्याला तरी मला drop कर गुडलक चौकात.appointment चुकली तर परत घ्यावी लागते. त्याआधी गुडलक मधेच अर्ध अर्ध बन आम्लेट खाऊ. ट्रेडमिल वर ब-याच कॅलरिज बर्न केल्यात. थोड्या अर्न पण करते" डोळा मारत ती म्हणाली.
तिला सोडून जाताना मनात विचारांचं काहूर माजलं होतं. जेवढा मी तिला टाळू पाहत होतो तेवढं तेवढं ते मला कठीण जात होतं!
वर्षभरातच गुड्डूने माझ्या शब्दांचं,स्वतःच्या कॉन्फीडन्सचं आणि आई बाबांच्या विश्वासाचं चीज केलं. पगार आणि फ्लाईट अलौन्स मिळून महिना सत्तरऐंशी हजाराचा गल्ला जमवणा-या एमिरेट्सच्या केबिन क्रू मध्ये ती प्लेस झाली. माझं लास्ट इअर इंजिनियरिंगच अडमिशन आणि तिचं प्लेसमेंट एकदम झालं! काका काकूंनी माझे उगीचच आभार मानले. ती तिच्या टाईट शेड्युल मध्ये बिझी झाली तरी तिचा संपर्क होताच. लास्ट इअरला असताना मलापण "औकात" मधला जॉब मिळाला. नवीन जॉबचं नाविन्य, नवे सहकारी, कार्पोरेट लाईफ यांच्याशी जुळवून घेता घेता दोन वर्ष कशीच निघून गेली. दरम्यान चिंगी बोहल्यावर चढली. पण मी आउट ऑफ स्टेशन असल्याने मला लग्नाला जाता आलं नाही.बरं झालं.. नाहीतर नक्कीच मला तिने तिच्या बोचणा-या नजरांनी घायाळ करून सोडलं असतं!! गुड्डूने पण 'एमिरेट्स' वरून कतार एअरवेज जॉब स्वीच केला.
"चम्या, मी प्राडा घेतला" मी मुंबईला गेलो असताना एकदा मला गुड्डूचा फोन आला.
"हे काय आहे ?"
"अरे ब्रांड आहे मोबाईलचा, इटलीतला ब्रांड आहे fashionमधला लीडिंग. दुबई मध्ये घेतला. फंक्शनिंग झेपत नाहीये..शिकवशील ना मी येईन तेव्हा?"
"मला झेपलं तर आणि तू भेटलीस तर शिकवेन.."
"ए मी तुझ्या भरवशावर घेतलाय काय हा फोन कारण तुम्ही काय बाबा हुशार लोक.." मी हसलो. काही जुने क्षण आठवले.
"पण आपण भेटलो तर ना? ऑर्कुट नसतं तर तू कशी दिसतेस ते सुद्धा विसरून गेलो असतो मी एव्हाना!"
ती दिलखुलास हसली."धिस टाईम वी विल मेक इट याSSS समहाऊ." हल्ली तिच्या वागण्याबोलण्यात मच्योरीटी जाणवत असे म्हणून बालीशपणा पूर्ण गेला होता असंही नव्हतं.
"कुठेयस आता?" मी विचारलं.
"दोहा.."
"हे काय आहे?" मी जोक करावा म्हणून विचारलं. ती पुन्हा हसली.
"अरे,हॉल्ट आहे. वन stop फ्लाईट आहे आमची. आपल्याकडच्या संध्याकाळी मुंबईत land करणारे."
"मी मुंबईतच आहे अगं, रात्री निघणार आहे पुण्याला जायला..तिकीट बुक केलंय मी."
"काय म्हणतोस? आपण भेटू. कॅन्सल कर तिकीट. वी विल हायर अ कॅब. होम drop मिळेल. मला ऑफ आहे आता पंधरा दिवस.. यावेळी कशाला आजच भेटू. नक्की.."
सांताक्रूझला मी तिला रिसीव्ह करायला गेलो. फोन वरून जरी आमचं बोलणं असलं तरी तब्बल दोन-अडीच वर्षानंतर आम्ही प्रत्यक्ष भेटत होतो. ती नखशिखांत बदलली होती. आधी सुंदर होतीच आता तर अजूनच छान दिसत होती ती! फोटोपेक्षाही !!
"चमू.. man यू आ चेंज्ड..." तीच मला म्हणाली!
"आय शुड से धिस टू यू गुडड्या.. and आय चेंज्ड as in? इन विच सेन्स?"
"ओहो.. इंग्लिश हां!! गुड गुड..चेंज्ड as in , लुकिंग बेटर, स्मार्टर and लेट इट बी..एम नॉट गोइंग टू प्रेज यू मोर!! बट लेट मी कन्फेस. चमू नेम डजन्ट सूट यू एनिमोर.."
"ग्रुमिंग ग्रुमिंग.. यू नो.." मी हसत म्हटलं.
"सो यू स्टील रिमेम्बर द कॉनवर्सेशन वी हेल्ड at पराग?" तिने विचारलं. मी एक स्माईल दिली आणि म्हणालो "ऑफकोर्स!! आणि हो.. लोक खरंच हिंदीत बोलतात माझ्याशी! आफ्टर फोर ईअर्स युर थ्योरी अबाउट 'मराठी माणूस' होल्ड्स ट्रू and १००% valid !"
"मग? म्हटलेलं ना? असो.. बाकी? घरी गेला होतास इतक्यात?" मस्त हसत तिने विचारलं
"मागच्या महिन्यात जाऊन आलो."
"आणि माझ्या?"
"गेलो होतो तीन चार महिन्यापूर्वी तेव्हा काकू एकट्याच होत्या पण हल्लीच काका भेटले होते..साधारण आठवडाभरापूर्वी, रेणुकादेवी शाळेच्या गल्लीत.."तिने तिरकस नजरेने बघितलं " मी पण जात होतो तिकडून तेव्हा क्रॉस झाले, मी हाक मारली.मग बोललो. माझी चौकशी केली. कुठे असतो,काय करतो वगैरे..'घरी येत जा' म्हणत होते. इट सिम्स, हि इज फिलिंग लोनली विदाउट हिज डॉटर्स"
"आय नो.. हि लव्हज अस टू मच .."
कॅब मध्ये बसल्यावर आमचं बोलणं कंटिन्यू झालं.. कारण 'प्राडा' काही फारसा वेगळा नव्हता, उगीच पैसे वाया घालवायची कामं! बाकी काही नाही.
"चिंगी 'दिल्या घरी सुखी' वगैरे आहे असं दिसतंय एकंदरीत. तुला उजवली कि ते मोकळे झाले अशा भाषेत बोलत होते काका त्या दिवशी.."
गुड्डूने माझ्या खांद्यावर एक चापटी मारली. " ए गप रे.."
"मला पण विचारत होते लग्नाचं काय चाललंय म्हणून.. आणि काही चाललंय का म्हणूनही! म्हटलं काही नाही एवढ्यात."
"आणि माझ्याबद्दल काही बोलले नाहीत?"
"नाही.. म्हणजे माझ्या ओठांवर आला होता प्रश्न तुझ्या लग्नाबद्दल.. पण मीच आवरलं स्वतःला.." आपल्याला काही गोष्टी ऐकायच्याच नसल्या तर तसली सिच्युएषन आपण स्वतःहून टाळतो,त्यातला तो प्रकार होता,पण मला ते कबूल करायचं नव्हतं!
"काय म्हणतोस? बोलले नाहीत का की तिने स्वतःच एक मुलगा बघितलाय म्हणून?"
"क्काय?"
मी भानावर आलो.. गुड्डू खिडकीतून बाहेर पहात होती..आमचा संवाद माझ्या "क्काय?" वर थांबल्याला आता दीड-दोन तास उलटले होते. कॅब कामशेत च्या जवळपास असावी.. मी ड्रायव्हरला रेडीओ बंद करायची रिक्वेस्ट केली.
"तर तू प्रेमात पडलीयेस !! थोडक्यात हि गुड्डू आता कोणाचीतरी गुड्डू होणार..हम्म.. अर्थात मला काय फरक पडणारे म्हणा! माझ्यासाठी तू आधीपण गुड्डू होतीस आणि नंतर लग्न होऊन तुला पोरंबाळं झाली तरी तू गुड्डूच राहणार.. पण खरंच तू आता रिलेशनशिपमध्ये असणारेस? तुझ्या आयुष्यातला हा एवढा मोठा डिसिजन आणि मी त्यात अप्रत्यक्षपणे का होईना, इन्व्होल्व सुद्धा नाही? असं कसं होऊ शकतं यार?" मी विचारांना वाचा दिली.
"चम्या. अरे असं होईल का? म्हणूनच बोलले ना मी तुला? डायरेक्ट लग्नाला ये म्हणून तर नाही ना सांगितलं? मला तो आणि त्याला मी जरी आवडत असले तरी लग्न वगैरे पुढच्या गोष्टी आहेत रे.."
"हम्म.." माझा चेहरा का पडला मलाच कळलं नाही.
"man ..व्हॉट हम्म?? से समथिंग.. आणि काय म्हणालास मगाशी? मला काय फरक पडणारे? हो ना? मग चेहरा का पडलाय तुझा?"
"..."कॅबमध्ये एक गुदमरवून टाकणारी शांतता पसरली
"व्हॉsssट??" दोन हात दोन्ही बाजूला करून खांदे उडवत तिने विचारलं..
"stop आस्किंग मी that अगेन and अगेन.. मला फरक पडतो समजलं?" मी वैतागून म्हटलं.
ती शांत बसली..
"आय.. आय..i had फीलीन्ग्स फॉर यू गुड्डू; दो यू नेव्हर had इट फॉर मी.. आय जस कुडन्ट से इट.." मी नजर दुसरीकडे वळवली. पापण्यान्पर्यंत आलेलं पाणी आतल्या आत जिरवण्यासाठी मला बाहेर बघणं गरजेचं होतं.
ती निःशब्द झाली होती.माझ्याकडेही बोलायला अजून शब्द उरले नव्हते. भयाण शांततेत कॅब चा आवाज एखाद्या ट्रकसारखा वाटत होता..
"चमू..लिसन.. आय नो यू.. आय नो यू सिन्स इअर्स नाऊ.. यू नो व्हॉट? यू ट्राय अ लॉट, बट यूअर व्हॉईस कॅन नॉट लाय.. सो आय ऑलरेडी नो that यू लव मी..फ्रॉम लास्ट मेनी इअर्स.. "
"स्टील? स्टील यू सेड 'येस' टू समबडी एल्स, गुड्डू? माझा एकदा..निदान एकदा साधा विचारपण नाही आला तुझ्या मनात? एवढं सगळं माहित असूनसुद्धा?" माझा आवाज हळवा बनला.
"माझं पूर्ण ऐकून तर घेशील?"
"नो गुड्डू.. आय जस्ट कान्ट! यु आर नॉट माईन एनिमोर..रादर आय डोन्ट have that राईट..समबडी एल्स has it." पुन्हा एकदा जीवघेणी शांतता पसरली..अजून काही क्षण तसेच गेले असते तर माझ्या अश्रूंनी माझं सांगणं ऐकलं नसतं तेवढ्यात शांतताभंग करत तिने विचारलं.."व्हॉट इफ आय से that समबडी एल्सेस नेम इज मिस्टर चमेश?"
माझा कानांवर विश्वास बसत नव्हता.. पुन्हा एकदा शांतता. पण यावेळी ती जीवघेणी नक्कीच नव्हती! "मी?"
ती खुदकन हसली..
"माय बेबी लुक्स क्युट व्हाईल स्मायलिंग!"
मी हसलो.. मला परिस्थितीची जाणीव व्हायला काही क्षण लागले.. साला..आत्ता पटलं! चिंगी बरोबर होती!! मी उगीच खार खाऊन राहिलो तिच्यावर.. 'नथिंग फिशी' वगैरे मनाची समजूत होती फक्त!! एवरीथिंग वॉज फिशी.. and शी स्मेल्ट इट वेल इन advance ! चिंगी,यू आर सिम्पली ग्रेट!! राहा राहा,बाई.. दिल्या घरी तू सुखी राहा!!
"मी सांगितलं मम्मी पप्पांना.. की डोन्ट सर्च फॉर एनीबडी, आणि मग मी तुझ्याबद्दल सांगितलं.त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये...पण त्यांना बोलले होते मी कि मी स्वतःच त्याच्याशी बोलेन यावर म्हणून.."
त्याक्षणी मी जगातला सगळ्यात सुखी प्राणी होतो..काही गोष्टी अनपेक्षितपणे मनासारख्या घडल्या तर त्यातला आनंद काही औरच असतो..
"मी आजच घरी सांगतो माझ्या..सो व्हेन युअर पेरेंट्स विल अप्रोच इन फ्युचर ,इट शुड नॉट बी अ शॉक फॉर देम!"
'मग आपण असं करूया, मग तसं करूया' म्हणत मी खूप काही बोललो..
"अरे हो हो.. किती एक्साईटमेंट ती..आणि मला काय सांगतोयस हे सगळं?" तिने विचारलं आणि पुढे ती म्हणाली " and लिसन नो चमू.. शाल आय आस्क यू समथिंग?"
"येस.. शुअss.." माझे प्राण कानात आणून मी आतुरतेने तिच्या शब्दांची वाट पाहत होतो.. माझ्या कानांभोवती हातांची ओंजळ करत हळुवार आवाजात तिने विचारलं.."व्हाय डोन्ट यू टेल धिस ऑल टू माय पेरेंट्स?"
(समाप्त)
akhilesh....first time ekhadyaa lovestory cha happy ending wachun aanand zalaa re baba...changlaa aahe ...mast ch...jamun aalaa aahe pan saglaa ekdum...ani punyaatle reference ekdun chapkhal vaprle aahes...patkan visualize hota...zakkkas re partner...jio mere laal :)
उत्तर द्याहटवाRaghuraj
Lekhak lok kase vikshipta astat yaachaa ek namuna, sadar lekhkaalaa gmail var ping kele asta ::
उत्तर द्याहटवाme: namskaar,uttaraardh prachand aavdlelaa aahe
@khilesh™:pratikriya ithe swikarlya jaat nahit..dhanywaad!
Raghuraj
JAH BAHA RI ........
उत्तर द्याहटवाkhup mast...
उत्तर द्याहटवाChan ahe....ekdum must.....
उत्तर द्याहटवा@Raghu :एवढं कौतुक? ते पण माझं? शोभत नाही रे तुला!! तरीदेखील औपचारिक आभार मानायचं कर्तव्य पार पाडतो. हा हा! मुंबई-पुण्यातले रेफरन्स वापरले कि आपलेपणा वाटतो, नाही का? ;)
उत्तर द्याहटवादुस-या प्रतिक्रियेनंतर झालेलं संभाषण इथे छापण्याच्या योग्यतेच नसल्याने टाकले नाही परंतु "हिम्मत नसल्याने" ती प्रतिक्रियाही डिलीट करत नाहीये!
@विनायक : धन्यावाद्स!!
@Pradnya : thanks गं!
@adi : धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत..भेट देत राहा.
mast :)
उत्तर द्याहटवाgreat..... man, sahi story.. ek wel wachata wachata mazya pan dolyat pani aalelach... go ahead..
उत्तर द्याहटवाgr88..!! love story cha shevat god chava hich apeksha hoti tujhyakadun..!! :) bhari.. hyaa "guddu" madam kon he kalel ka aamhala..?? :P :)
उत्तर द्याहटवामस्त मस्त प्रेम कहाणी. आवडली बुवा. शेवट तर मस्तच झालाय.पण पूर्वार्धाच्या उत्तरार्धातली चिंगीची एन्ट्री बरोबर नाही झाली असे वाटले. बाकी फार दिवसांनी छान प्रेम कहाणी वाचायला मिळाली. बाकी गोष्ट वाचताना background music देता आले तर अजून मजा येईल.
उत्तर द्याहटवाkhup mast story ahe...happy ending... mastch;-)
उत्तर द्याहटवा@Prasanna : thanks!
उत्तर द्याहटवा@MK's : thanks for the appreciation..
@rohangaribe: तुझी अपेक्षा पूर्ण करण्यात थोडाफार का होईना यशस्वी ठरलो हे वाचून बरं वाटलं ! :) धन्यवाद..
@गुंजाळसाहेब : पूर्वार्ध आणि उत्तरार्ध वेगवेगळे लिहिले होते.. उत्तरार्ध वाचण्यासाठीची उत्कंठा थोडी ताणण्याच्या प्रयत्नात 'चिंगी'ची एन्ट्री झाली आहे! :) टीका आवडली आणि कौतुकाबद्दल आभारी आहे!
@bhagyashree : धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत!
@akhildeep- फार छान.. अजुन कही लिहिले आहेस का?? वाचायला नक्कीच आवडेल!
उत्तर द्याहटवा-मंगेश
thanks MANGESH for the words of appreciation.. keep visiting.. if u r fond of reading then there are some old posts too.. उजव्या बाजूला पॉप्युलर पोस्ट्स च्या खालीच अनुक्रमणिका आहे,तिथून जुन्या पोस्ट्स वाचता येतील..ब्लॉगवर तुझं स्वागत आहे..भेट देत राहा..
उत्तर द्याहटवाawesome story...keep it up
उत्तर द्याहटवाGreat story...keep writing
उत्तर द्याहटवाHi @khildeep.. Chaan ahe Story awadli.. :)
उत्तर द्याहटवाDhanywad @Sudha..
उत्तर द्याहटवा@Rutwika: Abhari aahe g!
@vijay gunjal: Abhar aani blogvar swagat. lobh asava!
Hey Akhilesh... Nice one.
उत्तर द्याहटवा-Swapna Kirtane
उत्तर द्याहटवा@Swapna: thanks a lot! :) Keep visiting..
उत्तर द्याहटवाchanach aahe love story.....
उत्तर द्याहटवाand again the writting in new topic too....
@sarita: २ भागांत लिहूनसुद्धा लव्ह स्टोरी शेवटपर्यंत वाचावीशी वाटली ना? कुठे कंटाळवाणी झाली नाही ना? ते एक बरं झालं..thank you very much.. Ad keep visiting the blog.
उत्तर द्याहटवासहज मराठी ब्लॉग विश्व वर फिरताना तुझया जगाचा शोध लागला अन् बघता बघता तुझा आक्खा ब्लॉग वाचला मी ...खूप मज्जा आली वाचताना :) .
उत्तर द्याहटवावरील कथा वाचताना (प्रकर्षाने) जाणवल की हे सर्व माझ्या डोळ्यांसमोर घडतय ..शब्दांमधून सारे जिवंतपणे उभा करायची तुझीशैली ... केवळ आप्रतिम !!!
असेच सुरेख लिहीत रहा.. जमेल तेव्हा तुझ्या ब्लॉग ला नक्की भेट देईन ..
चेतना
@चेतना : केलेल्या समीक्षणाबद्दल आणि दिलेल्या पावतीबद्दल मनापासून आभारी आहे.. म्हटल्याप्रमाणे ब्लॉगला भेट देत राहाशील अशी आशा बाळगतो. दरवेळेला नवीन काही असेलच याची शाश्वती नाही परंतु तसा प्रयत्न नक्की करेन.
उत्तर द्याहटवा