मंगळवार, १० ऑगस्ट, २०१०

मृगजळ अंतिम भाग

भाग -१
भाग -२

तो पुण्यात आला त्याला आता आठवडा होत आला होता. रोजच्या रोज मेसेजेस चा रतीब चालू होता.. एक दिवस त्याने मेसेज नाही केला तर रात्री तिचा मेसेज "no msg 2dy? ab kaam khatam to msg bhi khatam?"
क्काय?? आहे काय हे? ही अशी का बोलते नेहमी? आपले कॉम्प्रेहेन्डींग स्कील्स कमी आहेत कि वोक्याब्युलरी ? कसलं काम? काही वेगळा अर्थ असावा का या मागे? छे! कळायला काही मार्गच नाही. अर्थ विचारायला त्याने रिप्लाय केला तर त्याला "तू ते समजून घे" अशा टाईप चं व्हेग आन्सर!
कदाचित असंही असेल कि तिच्या मनात माझ्या बद्दल काहीतरी असेल! ती आपल्याला या गोष्टी सुचवतेय आणि आपण बहुधा समजून घेत नाहीये.

वीकेंडला ती परत पुण्यात आली. सोहमने तिला फोन केला. "तुला फक्त वीकेंडलाच माझी आठवण येते" असा लटका राग व्यक्त करून झाल्यावर आकांक्षाला सोहमने भेटायचं कधी ते विचारलं.. "संध्याकाळी मी फ्री झाले कि भेटू" असं म्हणून तिने कन्फर्मेशन सुद्धा दिलं.
संध्याकाळी तयारी झाल्यानंतर त्याने लिहून ठेवलेलं पत्र हातात घेतलं एवढ्यात मेसेज आला..
"i hv so many issues with u. we can't gel up"
सोहमला बसलेला हा पहिला शॉक! त्याने फोन केला.
"काय झालं अचानक? काय इश्यूज आहेत? या मेसेज चा अर्थ काय?"
"तुला समजला ना? तोच!"
"अगं, नाही कळला म्हणून फोन केला ना?"
"सोहम, माझ्या घरी माझे मम्मी पपा माझ्यासाठी लाईफ पार्टनर शोधतायत.. यू नो..आय जस्ट डोन्ट want टू स्टार्ट धीस अगेन.."
काय आहे हे? कशाचा कशाला संबंधच नाही! तिला घरचे स्थळं बघतायत म्हणून मला भेटणारपण नाही? मी काय मंगळसूत्र घेऊन उभा आहे का? त्याला काहीच झेपत नव्हत.
"...आणि तुझ्या इतक्या मैत्रिणी.. काल अंकिता,आज मी तर उद्या दुसरी कोणी.. हाऊ कॅन आय रिलाय ऑन यु?"
"....."
सोहम सुन्न झाला होता..

मम्मी पपा माझ्यासाठी लाईफ पार्टनर शोधतायत... वगैरे विचार ती करते म्हणजे तिच्या पण मनात हेच असणार!! सोहमने विचार केला आणि मेसेज टाईप केला "मला तू आवडतेस.. मला तुझी जन्मभर सोबत करायला आवडेल. आज आपण जर भेटलो असतो तर मी तुला हेच सांगणार होतो."
….पण आकांक्षाचा काहीच रीप्लाय आला नाही.

सोहमने एक-दोन दिवस वाट बघितली.. पुन्हा मेसेज केला.. पुन्हा नो रीप्लाय! त्याने बरेच मेसेज केले तिला त्यानंतर.. पण एकाचही उत्तर आल नाही.. फोन करायचा प्रयत्न केला तर उचलत नाहीच वरून " यू आर डिस्टर्बिंग मी.." सारखे रूड मेसेजेस.. सोहम सैरभैर झाला..
त्याने पुन्हा एकदा तिला सांगायचा प्रयत्न केला की एकदा.. फ़क्त एकदा मला माझी बाजू मांडू दे तुझ्यासमोर.. त्यानंतर तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य आहे. पण आकांक्षाकडून काहीच रीस्पॉन्स नाही..

शेकडो विनंत्या करूनही काहीच फरक पडत नाही हे पाहून सोहमचीही मन:शांति ढळली.

सगळं मस्त चाललं होतं. तू आलीस आणि एवढा फरक पाडलास माझ्यात.. पोरींना शष्प भाव न देणारा सोहम बदलला.. फक्त तुझ्यामुळे! प्रत्येक क्षणी तुझी आठवण मला छळते.. तुला विसरण्याच्या प्रयत्नात इतर गोष्टी विसरतो पण तुला विसरू नाही शकत! कोणत्या अधिकाराने माझा छळवाद मांडला आहेस तू?? का आलीस तू माझ्या आयुष्यात? का? का?
सोहमने कोणत्याही प्रतिक्रियेची अपेक्षा न ठेवता तिला मेसेज पाठवला.

आणि अखेरीस तिचा रिप्लाय आला!! सोहम आनंदला पण हा आनंद काही क्षणच टिकला..
"मी तुझ्या आयुष्यात आले होते मैत्रीण म्हणून! फक्त एक प्युअर फ्रेंड.. तो तू होतास ज्याने त्याला वासनेचे रंग दिले. स्वतःच्या आयुष्याची स्वतःच ओढाताण करून तू खापर मात्र माझ्यावर फोडू पाहतोयस. मी तुझ्या अवती भवती होते तेव्हा i was trying to be genuine. यावर एकच उपाय.. तू माझा विचार सोडून दे.."

सोहमचा चेहरा खर्रकन उतरला.. काय अपेक्षित होतं आणि काय पुढ्यात आलं?
"माझ्या मनात तुझ्याबद्दल real feelings च होत्या गं.. कसल्या वासना आणि कसले रंग?? आणि तुला कधीच असं काही वाटलं नाही का?"

"मुळीच नाही! मुलगी तुमच्या जोक्स ना हसली आणि तिने तुमच्या मेसेजेस ना रिप्लाय केला कि ती तुमच्या प्रेमात पडली असं समजणं म्हणजे मनाचा कोतेपणा सिद्ध करणं असं वाटत नाही का तुम्हा मुलांना?" आकांक्षाचा मेसेज आला.

काय?
नव्हतंच मनात काही तर कशाला नंबर दिला?
तोसुद्धा एकदा नव्हे तीन-तीनदा??
तिच्या मनाजोगता मी वागलो नाही तरी कशाला contact ठेवला?
गर्लफ्रेंड ची दहा दहा वेळा विचारपूस करून कशाला कन्फर्म केलं कि मला गर्लफ्रेंड आहे किंवा नाही ते?
"हाऊ कॅन आय रिलाय ऑन यू?" या प्रश्नाचा अर्थ असा नाही निघत का कि "इफ यू चेंज युअर attitude आय कॅन रिलाय ऑन यू?"
मी मेसेज नाही केला तर कशाला अस्वस्थ व्हायची ती?
"आय जस्ट डोन्ट want टू स्टार्ट धीस अगेन.." म्हणजे हेच ना कि "आय ऑलरेडी फेल फॉर समबडी and ही बेट्रायड मी,सो..आय जस्ट डोन्ट want टू स्टार्ट धीस अगेन.."?
माझ्या स्वभावाचा एवढा अभ्यास कशाला करत होती ती?
"तू इगो आणि सेल्फिशनेस काढून टाक मग एकदम आयडीअल पर्सन होशील मुलींसाठी" हा सल्ला तिने मला द्यायला माझ्या लग्नाचा कैवार घेतला होता का तिने?
"माझे मेसेज फक्त मलाच पाठवलेले असले पाहिजेत, ग्रुपला नाही. एखादेवेळेस तूपण लिही.. फॉरवर्ड नसला तरी चालेल" हा आग्रह कशासाठी होता?
आणि शेवटी तर i have so many issues with you म्हणे !! कसले issues ? ते तरी सांगायचं! केले असते की सॉर्ट आउट..
पण नाहीच सांगत! का? कोणास ठाउक?
सोहमला न उलगडलेल्या प्रश्नांनी भंडावून सोडले..

"मी काही एवढाही immature नाहीये गं,फक्त मेसेजेसच्या रिप्लाय वरून कन्क्लूजन काढायला.. पण मला तसं वाटलं.. आणि आयुष्यात एकदा प्रेमभंग झाला म्हणून सगळ्याच मुलांबद्दल वाईट मत नको करून घेऊ. माझ्या वर ही अशी चिखलफेक करायच्या आधी तू नयनाला तरी विचारायचंस माझ्याबद्दल.." सोहम ने तिला टेक्स्ट पाठवलं.

"तू कशावरून ठरवलंस कि मला तू आवडतोस? मला तू आवडत असतास तर मीच तुला तसं सांगितलं असतं. चिखलफेक मी करत्येय कि तू ते पहिलं ठरव. तुझ्या मनात माझ्याबद्दल भावना होत्या.. माझ्या मनात नाही.. आणि खरं प्रेम हे निरपेक्ष असतं..त्यामुळेच ते शोधायलाही कठीण असतं." आकांक्षाच उत्तर!

कागदावर लिहायला ही विधानं ठीक आहेत. पण अनुभवायला?? नको रे बाबा! सोहम मनातल्या मनात म्हणाला.

"माझी चूक झाली असं मी म्हटलय.. तुला ओळखण्यात माझीच चूक झाली. आणि जर मी तुझ्या भावनांचा विचार करत नसतो तर सरळ तुझ्या घरी जावून मागणी घातली असती ना.. पण त्यामुळे तू माझा आता करतेयस त्यापेक्षा जास्त तिरस्कार केला असतास "

"each & evry act of urs is makin' me hate u more & more day by day" आकांक्षाने भैरवी घेतली..

संपलं!! एखादी बिघडलेली गोष्ट सुधारण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न त्या गोष्टीला आणखीनच बिघडवत नेतात तसं झालं हे..
वपु म्हणालेत ते खोटं नव्हे..
"सगळ्यात वाईट तेव्हा वाटतं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या हेतूने करू पाहता आणि तुमच्या त्या हेतूबद्दलच शंका घेतली जाते.." सोहम विचार करत होता.. "शंभर वेळा माझं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न केला मी, पण माझ्या प्रत्येक वाक्यातून तिने वेगळाच अर्थ काढला.."

आयुष्यात परत कोणी आकांक्षा भेटेल की नाही माहित नाही.. आपल्यासाठी एकदम आदर्श मुलगी मिळाली पण बहुधा ती तिच्यासाठीच्या आदर्श मुलाच्या शोधात होती... तो मिळेल की नाही हे तिलाही माहित नाही.. पण सध्यातरी तिने आपल्यासाठी दरवाजे बंद करून घेतले आहेत. मृगजळामागे धावण्यात बरेच क्षण वाया घालवले आपण; तरीही सत्याला सामोरं गेलंच पाहिजे मला! जरी मी कितीही तहानलेला असलो तरी रस्त्यावर लांबवर दिसणारं पाणी हे वास्तवात नाहीये याची जाण ठेवायला हवी होती.. सोहम अचानक भावनाविवश झाला.. “कसं असतं ना? आयुष्यात ब-याच गोष्टी न मागताच मिळत गेल्या आपल्याला. ज्या मिळाल्या नाहीत त्यासाठी एफर्ट्स घेतले आणि मिळवल्या.. पण इथे हे हव असताना देखील मिळत नाहीये. कारण मी माझ्या मनाला हवं तसं समजावू शकतो पण जिथे दुस-यांच्या मनाचा प्रश्न आहे तिथे मी काय करणार? पण झाल्या प्रकारातून एक धडा नक्कीच घ्यायला हरकत नाही.. मुलीच्या मनाचा थांग लागणं अथवा लावणं हे खरंच कठीण असतं. आणि जर तिला नकारच द्यायचा असेल तर ती तो देतेच! भले मग त्याचं स्पष्टीकरण लॉजिकल वाटो अथवा निरर्थक!

तो टाईप करू लागला..

"तू माझा नंबर बार करण्याआधी किंवा माझ्या त्रासातून सुटण्यासाठी स्वतःचा नंबर चेंज करण्याआधी मीच डीक्लेअर करतो की हा माझा शेवटचा एसएमएस.. माझ्या मनात खरंच तुझ्याबद्दल खूप खूप चांगल्या आणि सोज्वळ भावना होत्या... मनोमन बरीच स्वप्नही रंगवली होती मी. पण मी तुला ओळखायची आणि सगळ सांगायची घाई केली... केलेली चूक आता परत सुधारता येणार तर नाहीच.. पण माझ्या मनात मात्र तुझ स्थान अढळ राहील. आयुष्यातल्या कोणत्याही वळणावर जर तुला मागे वळून पहावसं वाटलं अथवा परतावंसं वाटलं तर मी इथेच आणि असाच उभा असेन.. तुझ्या वाटेवर डोळे लावून.. "

तिच्यासाठी लिहून ठेवलेलं पत्र चुरगाळत त्याने तिचा नंबर सिलेक्ट केला.."टेक केअर डीअर" तो पुटपुटला... हातात धरलेला मोबाईल त्याला हळू हळू धूसर दिसू लागला आणि “सेंड” च बटन दाबता-दाबताच त्याच्या उष्म अश्रुंचे खरेखुरे थेंब मोबाईलच्या स्क्रीनवर पडले...

(समाप्त)

१४ टिप्पण्या:

 1. आरे यार अखिलेश मला तुझ्या कथा लेखना बद्दल आजच माहित पडले त्या मुळे मी तिन्ही गोष्टी आताच वाचल्या आहेत.

  मला एक काळात नाही मी तुझ्या ब्लॉग चा पाठलाग करतोय तरीपण हे नवीन बद्दल मला का कळत नाही आहेत.

  बर आता दीर्घकथे बद्दल

  गोष्ट छान होती
  शेवट थोड्या वेगळ्या प्रकारे हवा होता
  खूप ठिकाणी कडी तुटल्या सारखी वाटते आहे आणि प्रात्रांची सरमिसळ होते आहे

  मी हे केवळ वाचक म्हणून सांगत आहे समीक्षक म्हणून नाही
  कळावे
  तुझाच एक वाचक
  अमित गावडे

  उत्तर द्याहटवा
 2. अमित,
  मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! थोडक्यात, सुधारणांना बराच वाव आहे म्हणायचा!

  अंकिता आणि आकांक्षा या नावांमुळे थोडीशी गल्लत होत आहे हे मान्य.. पण कडी तुटल्याचे मला सापडत नाहीये. कदाचित मी काही गोष्टी गृहीत धरल्या असतील ज्या मी इथे मांडायला विसरलो. अर्थात कथालेखनाचा पहिलाच प्रयत्न असल्याने.. असो!

  आणि अशा कथांचा शेवट हा ब-याचदा गोडच असतो परंतु वास्तवातल्या अशा कित्येक कथा याच अर्थात कटू शेवटाच्या मार्गाने जातात. त्या घटनांना शब्दात उतरवण्याचा हा प्रयत्न होता.. अपेक्षित शेवट असता तर उत्कंठा ताणून धरण्यातली मजा निघून गेली असती असं मला वाटलं.. म्हणून थोडा वेगळा शेवट! :)

  उत्तर द्याहटवा
 3. व्वा!!! छान अखिलेश,छान लिहिलेश....कथेचा शेवट काहीही असो पण त्यातली "आकांक्षा" (छे रे पात्र नाही बोलत मी) ओढ..ओढ बोलतोय रे मी..हो ती (परत तेच शीट यार "ओढ") जाम आवडली ...शेवट पर्यंत धरून ठेवलस मित्रा!!!
  एकच request मराठी कथेत इंग्रजी शब्द किंवा वाक्य वापरायेचे म्हणजे जरा जपून...अर्थ मनाला भिडत नाही रे...

  ~शांत वाचक
  अजित...

  उत्तर द्याहटवा
 4. read all the parts today....I really dont read stories ...pan seriously couldn't stop myself from completing the story....sahi ahe actually could picturise few characters here....full too senti

  उत्तर द्याहटवा
 5. Atyant surekh. Atta thode thode kalatey ki tu aamachyakade aanandi ka navhtas? Khupach cchan.

  उत्तर द्याहटवा
 6. त्यान तिच्यावर खूप प्रेम केले ....
  स्वतःला अगदी तिच्या भवती झोकून दिले
  पण तिने कधी त्याला उत्तर नाही दिले
  गुज त्याच्या मनाचे कधीच समजून नाही घेतले !!!!

  त्याने मैत्रीला दिले प्रेमाचे गोड नाव . ...
  तिच्याच नादी लागून तो विसरून जाई सारे भाव ....
  तिला मात्र हे नाते वाटे मैत्रीचे गाव ...
  कधीच कळला नाही तिला त्याचा मनाचा ठाव !!!!

  तिच्या एका भेटीसाठी मन त्याचे आतुर व्हायचे ....
  समोर तिला पाहताना शब्दच अबोल राहायचे .......
  तिला मात्र त्याची गम्मतच वाटायची .....
  त्याची फजिती ती सगळ्यांना जाउन सांगायची !!!!!!

  तिच्या पाणीदार डोळ्यांमध्ये तोः हरवून जायचा ....
  तिच्या हास्याची लकेर आपल्या मनी साठवायचा ........
  ती मात्र त्याला अगदी वेडा म्हणायची ........
  गोड तिच्या वाणीने त्याला घायाळ करायची !!!!

  त्याच्या मनी आणखी आहे भोळी ही आशा...
  त्याचा पदरी नाही पडू देणार ती निराशा ...
  फिरुनी मागे तिला मी नक्कीच आठवेल ....
  साद तिच्या होकाराची मी उरात साठवेल ........

  पण तिला ते गुपित कधीच नाही उमगले
  आभासी त्या दुनियेत तिने .
  त्याला एकटेच पाठवले ,
  त्याला एकटेच पाठवले .....


  this poem was suiting the post so
  jus made an effort to post it...gdtc

  उत्तर द्याहटवा
 7. @अजित: धन्यवाद!! आताच्या काळातला संवाद असल्यामुळे इंग्लिश वापरले आहे.. पूर्ण मराठी असते तर कदाचित ते उथळ वाटले असते.. जाणून बुजून लिहिलेले.. ओघ मेंटेन करण्यासाठी आणि टेम्पो कायम ठेवण्यासाठी ती भाषाही वापरावी लागली. आणि काही शब्द मराठीत font मध्ये टाईप करता येत नाहीत त्यामुळे नाईलाज होतो जसा कि "font" "want".. सांभाळून घेणे..
  @trupti : thanks for reading
  @sudha : your earlier comment was good.. why u deleted that? and this one is even better!! thanks for converting all the three parts in a single poem!! ही कविता तुझी आहे का?
  @vinayak : प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार पण काय "थोडे थोडे कळतेय?" जरा विस्तृत स्पष्टीकरण दिलास तर फार बरं!!

  उत्तर द्याहटवा
 8. @madhuri : An Akhil .अं..माझी काहीच हरकत नाहीये..! ब्लॉगला अशीच भेट देत राहा..

  उत्तर द्याहटवा
 9. @madhuri : आणि हो..गोष्ट आणि लिखाण आवडलं हे पाहून बरं वाटलं..आणि उत्साह सुद्धा वाढला! :)

  उत्तर द्याहटवा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!