तसे आमच्या शाळेत कम्प्युटर होते पण ते हेमाडपंथी! एकदम
बाबा-आदम च्या जमान्यातले! चार्ल्स बँम्बेज ने शोध लावून टाकून दिलेले
म्हटलं तरी हरकत नाही. देवळात जातात तसं रूमच्या बाहेर चपला बिपला काढून
जावं लागत असे. आत थंड वाटायचं. ए सी-काळोख वगैरे! मॅन्युअल वोल्टेज
स्टॅबिलायजर होता. आमच्या सरांना तो ऑपरेट करता येत नसल्यामुळे 'व्होल्टेज
कमी आहे' या कारणामुळे ते कम्प्युटर चालूच केले जात नसत. एकदा कोणीतरी खेळ
करताना हाताने स्टेबिलायजर चा नॉब फिरवला तेव्हा व्होल्टेज ऍडजस्ट झालं.
त्याने सरांना शिकवलं तेव्हापासून आम्हाला ते वापरता येऊ लागले. आम्ही
त्या कम्प्युटरला पहिल्यांदा चेस मध्ये हरवलं तेव्हा 'गॅरी कास्पारोव्ह ला
कशाला भारी म्हणतात बुवा?' असं वाटलं होतं! नंतर पुन्हा एक दोनदा हरवलं
तेव्हा कळलं कि हे अगदीच जुनाट काहीतरी आहे. कीबोर्ड, मॉनिटर, सिपीयू असली
थियरी शिकण्याव्यतिरिक्त त्या ठोकळ्यांचा बाकी काही उपयोग नव्हता. तरीपण
"आमच्या शाळेत कँम्पुटर आहे" हे सांगायला ते डबे उपयोगी पडले!
दहावीनंतर
छोट्या गावातून मोठ्या शहरात आलो तेव्हा इंटरनेटशी पहिल्यांदा गाठ पडली..
शाळेत तशी तोंडओळख होती पण अगदीच जुजबी. ते म्हणजे माहितीचा अथांग साठा
आहे, कोणतीही माहिती झटक्यात हजर करतं वगैरे थेरोटिकल आणि ऐकीव ज्ञान होतं
पण प्रत्यक्षात काय असतं ते इमॅजिनपण करता येऊ नये इतकं ते अपुरं होतं.
काही स्थानिक वर्गमित्र त्या काळातही एकमेकांशी अमुक मोडेम,तमुक केबीपीएस
स्पीड च्या गोष्टी करत तेव्हा गुपचूप ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता.
जेव्हा
'आपल्याला काहीच समजत नाहीये' हे फार फार म्हणजे अगदी अति-फार वाईट फिलींग
आलं तेव्हा मग मी एका मित्राला विचारलंच कि हे काय असतं बुवा? तेव्हा तो
मला एका इंटरनेट कॅफे मध्ये घेऊन गेला. 'कॅफे' म्हणजे फक्त कॉफी हाऊस नसतं
हे तेव्हा कळलं. इतरांचं ऐकून इन्टरनेट च्या ऐवजी 'नेट' हा शब्दच तोंडात
बसला. कॉलेजच्या आजूबाजूला तेव्हा अशा कॅफेजचं अमाप पीक होतं. ताशी दहा
रुपये ते पंचवीस रुपयापर्यंतच्या वेगवेगळ्या दराने वापरायला डेस्कटॉप मिळत
असे. दहा रुपड्यांच्या कॅफे समोर आमच्या सारखे हॉस्टेलाईट लाइन लावून असत!
गेम खेळायचे असतील तर ८ रुपये नाहीतर १०, वगैरे प्रकार असत. आम्ही नेटकरीच..
दमड्या मोजून बैठा खेळ खेळणं हि संकल्पना अजूनही पचायला अवघड जातेय तर
तेव्हाचं काय सांगावं?
मित्राने
एक आयकॉन दाखवून इन्टरनेट एक्सप्लोरर कसा चालू करायचा.. याहू.कॉम कसं
वापरायचं वगैरे दाखवलं.मग याहू वर अकाउंट ओपन करून दिलं. तेव्हा तर माउस
जास्त हलवला तर कर्सर स्क्रीनवरून निघून जाईल आणि मग परत आणता येणार नाही
या भीतीने मी खूपच हळू हळू आणि खूपच जपून माउस हलवायचो! त्यानंतर मग शंका
विचारून, नेट वर वाचून चॅट रूममध्ये जॉईन कसं व्हायचं, कोणाही अनोळखी अकाउंटशी बोलायला कशी सुरुवात करायची वगैरे हळू हळू समजत गेलं. त्यानंतर मग आयडी, चॅट, मेल अशा शब्दांचे अर्थ बदलून गेले!
आधी ज्या कॅफेत ज्या कम्प्युटर वर पहिल्यांदा मित्राबरोबर गेलो होतो , मी नेहमी त्याच ठिकाणी जायचो, त्याच कम्प्युटर वर बसायचो. डेस्कटॉप वर ठराविक ठिकाणी आयकॉन असायचे त्यावर क्लिक करून इंटरनेट एक्सप्लोरर, चॅट रूम चालू करायचो. एकदा गर्दीमुळे मला दुसरी जागा मिळाली, त्या कम्प्युटर वर ते आयकॉन्स दिसेनात तर मला इंटरनेट चालूच करता येईना.. १० मिनिटं धडपड केल्यावर शेवटी कॅफेच्या माणसाला बोलवावं लागलं. त्यानं 'ऑल प्रोग्रॅम्स' मधून इंटरनेट आयकॉन काढून दिला आणि विचित्र चेहरा करून बघत गेला! चॅट रूम जॉईन केल्यावर पण गंमत असायची. आपल्या hi ला रिप्लाय आल्यावर ASL please अशी विचारणा करायची प्रथा होती. asl म्हणजे एज-सेक्स-लोकेशन.. त्याचं ऊत्तर साधारण 17 m pune अशा स्वरूपाचं असे.वास्तविक पाहता कोणाच्याही asl चा मला किंवा माझ्या asl चा इतर कोणाला काडीचा फायदा झाल्याचा आढळलं नाही. काही काळानंतर LovelyAngel123 नाव धारण करणारे सुद्धा शेवटी आपल्या सारखे पोरगेच असतात हे कळल्यानंतर मी चॅटरूम चा नाद सोडून दिला. आपला उद्देश काहीही असला तरी कोण- कुठलं -कोणीतरी- कुठूनही- कुठल्या उद्देशानं चॅट करत असेल कोणास ठाऊक?
याहूमेल आणि हॉटमेल त्यावेळी १० एमबी चा मेलबॉक्स देत असत. काहीतरी फुकट
वापरायला मिळतंय आणि कुठूनही ऍक्सेस करता येतं हि कल्पनाच माझ्यासाठी
'क्रांतिकारी' कॅटेगरीत येत होती! पुढे इंडियाटाइम्स ने १०० एमबी चा
मेलबॉक्स दिला तेव्हा मला हॉटमेल गरीब वाटायला लागले. बरं या मेलबॉक्स चा तसा
मला अजिबात उपयोग नव्हता! ज्या मित्रमंडळींकडे हे इंटरनेटचं डायल इन
कनेक्शन होतं ते रोज कॉलेजात भेटत असत. त्यांना काय पाठवणार ईमेलने?
डोंबलं? उगीच नेटवर गेलो की सगळे मेलबॉक्स उघडून एखाद्यामध्ये क्वचित
कधीतरी आलेलं एखादं दुसरं चुकार स्पॅम मेल, आपल्यालाच आलंय असं समजून
वाचायचं नि डिलीट करायचं या व्यतिरिक्त इतर काही करता येत नसे पण याहू आणि
एमएसएन च्या होमपेज वरून अख्ख्या जगातल्या लक्ष वेधून घेणाऱ्या घडामोडी
कळत असत त्याचं मला कोण कौतुक वाटे! नंतर नंतर 'दिल से देसी' वगैरे नावाचे नको नको
ते याहू
ग्रुप्स जॉईन करून आपल्याला नेहमी मेल यावीत अशी सेटिंग करून ठेवली होती
मी. त्याला 'सबस्क्राईब' करणं म्हणतात ते माहितीदेखील नव्हतं. नंतर कधीतरी
रेडिफमेलवर अकौंट उघडलं आणि मग याहू हॉटमेल आणि इंडियाटाईम्स मागं पडलं.
रेडीफने तेव्हा एक जीबी च्या मेलबॉक्स सकट एकदम भारी दिसणारा लुक दिला
होता. तोपर्यंत बरेच लोक इंटरनेट वापरायला लागले होते. आपल्याला आलेले
इमेल सरसकट सगळ्यांना फॉरवर्ड करणे हा एक छंद समजला जात होता!
एका
मित्राने खूपसे पैसे मोजून नवा असेम्ब्लड कॉम्प्युटर घेतला होता,
तब्बल ६४ एमबी रॅम चा! त्याचं कोण कौतुक होतं इतरांना.. (म्हणजे त्यावेळी
कॉम्प्यूटरच 'कॉन्फिगरेशन' माहित असणाऱ्या लोकांना!) हे असं साधारण काही
वर्षं चालू राहिलं.. कॉलेज बदललं, मित्रमंडळ विस्तारलं. डायल इन कनेक्शन
वाले एव्हाना ब्रॉड बँड वर शिफ्ट झाले होते. कॅफे मध्ये ८ रुपयात wolf आणि
nfs 2 खेळून जीव रमवणारे, आता ताशी वीस रुप्यकाणी मोजून 'काउंटर स्ट्राईक'
आणि 'एज ऑफ एम्पायर' खेळायला लागले होते. कानाला हेडफोन लावून
खेळणाऱ्यांच्या तोंडातून शिव्या बाहेर पडल्यावर समजायचं कि स्क्रिनच्या
आतमध्ये गोळ्या बसल्यामुळे रक्ताच्या चिळकांड्या उडून प्लेयर उताणा पडलेला
असणार! तोपर्यंत याहू मेसेंजरच प्रस्थ बऱ्यापैकी पसरलं होतं. आता
बऱ्याचजणांचं याहू चॅटचं अकाउंट असल्यामुळे ओळखीचं कोणी ऑनलाईन आलं कि
त्याला 'hi' असा मेसेज पाठवून रिप्लाय ची वाट बघायचो.. आपण नेट वापरत
असताना मोजकेच लोक-म्हणजे अगदी ३-४ जण-ऑनलाईन
येत असल्यामुळे असं चॅटिंग करायलाही मजा यायची. ग्रुप्स च्या
सब्स्क्रिप्शन मुळे मेलबॉक्स भरायला लागले होते आणि बरेचसे मेल्स डिलीट
करायला उगाचच जीवावर येत असल्यामुळे मेलबॉक्स ओव्हरलोड होऊन मेल्स बाउंस
होईस्तोवर ते डिलीट केले जात नसत
त्याचवेळी कधीतरी सोशल नेटवर्किंगची सुरुवात झाली. कुणा मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या सांगण्यावरून hi5 वर पहिल्यांदा अकाऊंट ओपन केलं. ५० एक ओळखी-अनोळखी मंडळीचा गोतावळा जमला. या साईटला पद्धतशीरपणे 'सोशल नेटवर्किंग साईट' अस काही म्हटलंही जात नव्हतं. हि याहू ग्रुप च्या आयडियेवरून आलेली 'ग्रुप्स'ची सुधारित आवृत्ती ज्यात फोटो बिटो अपलोड करता येतात असं काहीसं मला वाटायचं.
हा प्रकार पचवतोय न पचतोय तोपर्यंत ऑर्कुट (उच्चारी 'ओरकुट' ) आलं आणि त्याने सगळीकडे खळबळ माजवली. बिल गेट्स च्या विंडोज ने अमेरिकेत जितकं सामान्य माणसाला कम्प्युटर कडे खेचून आणलं त्यापेक्षा जास्त या 'ऑर्कुट'ने भारतातल्या तरुण वर्गाला कम्प्युटरकडे खेचलं असेल. नेट कॅफेत जाऊन मेल बघण्यापेक्षा हा विरंगुळा भारी होता. हळू हळू ऑर्कुट हा इंटरनेट वापरणाऱ्या जवळपास सगळया तरुण वापरकर्त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेला. ऑर्कुट वर लॉगिन केल्यानंतर सगळ्या जुन्या मित्रमंडळींना शोधणं त्यांच्याशी परत -इन्टरनेट वर का होईना- कनेक्ट होणं हा नवा खेळ झाला.. प्रत्येकाचं दर वेळी लॉगिन केल्यावर आपले 'फॅन्स' पाहणं, इतरांचे फोटो पाहणं, आपलं स्क्रॅपबूक चाळण एवढंच नव्हे तर कोणाचंतरी प्रोफाईल उघडून स्क्रॅपबुक्स चाळून, त्यावरून कसले कसले आडाखे बांधणं असली नसती डिटेक्टिव्हगिरी सुरु झाली. सुरुवातीला असणारं 'फक्त नऊ फोटोज' चं बंधन काहींना त्रासदायक वाटत असे, कोण जाणे का परंतु त्यानाही आपले फोटो सगळ्या पब्लिकने पाहावेच पाहावे अशी इच्छा असे. तेव्हा तर लाईक कमेंट्स चा हि प्रकार नव्हता मग कोणी ते बघितले नाही बघितले तरी काय फरक पडतो पण नाही .. ते पब्लिक आपलं प्रोफाईलचं नाव बदलून 'अमुक अमुक '(Album Updated)' वगैरे प्रकार करत असत, काही अतिउत्साही महाभाग हि गोष्ट मित्रमंडळींच्या स्क्रॅपबुकमध्ये खरडूनही सांगत असत. नंतर मग कधीतरी ऑर्कुटने सिक्युरिटी फीचर्स आणून प्रोफाईल मधली कुठली गोष्ट कोणाला दिसावी अथवा दिसू नये याची सोय केल्यावर हा प्रकार कमी झाला.
उत्तरार्ध:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!